Blood Pressure
उच्च रक्तदाब रुग्ण करत असलेल्या 5 सामान्य पण गंभीर चुका
उच्च रक्तदाब रुग्ण करत असताना या 5 सामान्य पण गंभीर चुका होतात:
1. Blood Pressure नॉर्मल आला की औषध बंद करणे ❌ तुमचा BP आता 120/80 आहे म्हणून औषध बंद करू नका. लक्षात ठेवा, BP औषधामुळे नॉर्मल आहे. JNC 8 guidelines नुसार, औषध बंद करायचं की नाही हे फक्त डॉक्टर ठरवतात, तुम्ही नाही.
2. वेळ आणि डोस स्कीम गोंधळलेली ⏰ सकाळी 9, कधी 11, कधी विसरतो... Blood Pressure control साठी steady-state plasma levels आवश्यक आहेत, वेळेवर न घेतल्यास अचानक fluctuations होतात. हे fluctuations स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक होण्याचं कारण ठरू शकतात.
3. मीठ खाण्यावर फारसा लक्ष न देणे 🧂 “मी मिठाचं काही करत नाही” म्हणणारे दररोज 2–3 वेळा पापड, लोणचं, बिस्किट्स खातात! Hidden sodium हा एक underestimated enemy आहे. Processed food आणि मिठाचे प्रकार यामुळे salt overload होतो, ज्यामुळे औषधे कमी पडतात.
4. फक्त BP गोळी घेतली म्हणजे झालं हा गैरसमज 💊 अनेक रुग्ण फक्त ACE inhibitor गोळी घेतात पण Lifestyle Modifications करत नाहीत. Walk, weight loss, low salt diet, alcohol avoidance हे treatment मध्ये समान भागीदार आहेत. औषध नाही तर हेच main therapy आहे!
5. BP monitor घरी आहे पण वापरत नाहीत किंवा चुकीचा वापर करतात 📉 मशीन आहे पण पाऊसाळा, लग्नसमारंभ, पिकनिक मध्ये BP tracking विसरतात. White coat hypertension किंवा Masked hypertension ओळखणं शक्य होत नाही. American Heart Association (AHA) रोज 2 वेळा 5–7 दिवस दर महिन्याला मोजण्याचा सल्ला देते.
BP हा फक्त नंबर्सचा खेळ नाही, हा शरीरात चालू असलेला silent war आहे, जो रोज समजून घ्यावा लागतो.
"BP कमी झाला म्हणून औषध थांबवणं म्हणजे अंगात ताप नसल्यामुळे अँटीबायोटिक थांबवणं सारखं आहे; दिसायला बरोबर वाटतं पण आतून चुकीचं असतं!" ❤️
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts