Just For Hearts

Mental Wellness

ताण अचानक वाढला तर काय कराल?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

ताण अचानक वाढला तर काय कराल? त्या क्षणी शरीराला शांत कसं करायचं?

ताण (stress) आला की आपण विचार करतो “काय होईल?”

पण शरीर लगेच alarm mode मध्ये जातं: - heart rate वाढते - BP वाढतो - श्वास वेगवान होतो

त्या क्षणी शरीराला calm signal देणं महत्वाचं आहे.

1. Breathing Reset 4 सेकंद श्वास घ्या… 6–8 सेकंद हळू सोडा. → लांब श्वास सोडल्यावर vagus nerve activate होते. ✔ heart शांत होते ✔ मेंदूला “धोका नाही” असा signal मिळतो.

2. Eye Relaxation डोळे बंद करून बोटांनी हलका massage करा. → oculocardiac reflex activate होतो. ✔ heart rate कमी होतो ✔ ताण कमी जाणवतो (हलका pressure, जोरात नाही)

3. Neck Awareness मानेला जिथे pulse जाणवते तिथे हलका स्पर्श करा. → baroreceptors activate होतात. ✔ BP शांत होतो ✔ nervous system relax होते (massage नाही, फक्त हलकी जाणीव)

4. Movement Reset 2–5 मिनिटं चालून या. → cortisol (stress hormone) कमी होतो. → body “freeze” मधून बाहेर येते. ✔ विचार स्थिर होतात ✔ clarity वाढते

5. Visual Reset स्क्रीनपासून दूर जाऊन आकाश / झाडं बघा. → brain overload कमी होतो. → default mode network reset होतो. ✔ focus परत येतो

6. Hydration Reset एक ग्लास पाणी हळू प्या. → dehydration stress वाढवते. ✔ शरीर relax होते ✔ थकवा कमी होतो

7. Name the Stress मनात बोला “मला आत्ता ___ मुळे ताण येतोय.” → amygdala (fear center) शांत होते. → thinking brain active होते. ✔ panic कमी होतो ✔ control वाढतो

महत्वाचं: हे उपाय छोटे वाटतात… पण हेच body switch आहेत. 👉 alarm → calm 👉 fight/flight → rest/repair

📌 ताण येणं normal आहे… पण त्या क्षणी शरीराला शांत करणं, ही skill आहे.

हेच आपण Just For Hearts मध्ये शिकवतो - routine, awareness आणि tracking.

तुमचे stress patterns आणि vitals track करा. Basic tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत.

ताण आला की तुम्ही लगेच काय करणार? 🌬️ श्वासावर control करेन. 👁️ डोळे relax करेन. 🚶‍♂️ चालायला जाईन. 🤔 आजपासून शिकतो.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#stress-relief#stress-management#mental-health#daily-habits#lifestyle-medicine#heart-rate#blood-pressure#nervous-system
Share:WhatsAppXFacebook