Just For Hearts

Lifestyle

सवय जोडा आधीच्या सवयींशी Anchor करून

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

B.J. Fogg म्हणतात, “New habits stick better when you anchor them to something you already do every day.”

याचा अर्थ नवीन सवय एखाद्या आधीच असलेल्या, रोज होणाऱ्या सवयीला जोडली तर ती जास्त टिकते. कारण ती “नवीन काम” म्हणून वाटत नाही, तर त्या जुन्या रुटीनचा एक भाग वाटते.

माझे मत: आरोग्य सवयी टिकत नाहीत याचं एक मोठं कारण म्हणजे त्यांना रोज “वेगळा वेळ” आणि “वेगळी तयारी” लागते. पण जर आपण ती सवय आधीच असलेल्या action नंतर केली, तर ती स्वाभाविक होते.

उदा. रुग्णांनी BP मोजण्याची सवय सकाळच्या चहाच्या आधी केली, तर विसरणं जवळजवळ थांबतं.

नवीन कल्पना: 1. सकाळी दात घासल्यानंतर → एक मोठा ग्लास पाणी प्या. 2. चहा/कॉफी ठेवताना → 2 मिनिटं deep breathing करा. 3. फोन चार्जर लावताना → 10 bodyweight squats करा. 4. जेवण बनत असताना → किचनमध्ये उभं राहून calf raises करा. 5. TV बंद केल्यानंतर रात्री → 5 मिनिटं स्ट्रेचिंग करा. 6. झोपण्यापूर्वी बेडवर बसून → gratitude लिहा किंवा 1 मिनिट meditation करा. 7. दरवेळी हात धुताना → 2 shoulder rolls आणि 2 neck stretches करा. 8. सकाळी दरवाजा उघडताना → 3 deep breaths घेऊन दिवसाची सुरुवात करा.

आज एक नवीन सवय ठरवा आणि ती आधीच असलेल्या रोजच्या action नंतर जोडा.

आपणही नवनवीन कल्पना जरूर सूचवा.

सवय लहान असली तरी 6 महिन्यांनी ती तुमच्या आयुष्याचा भाग बनेल.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#tinyhabits#healthy-living#doctor-tips#small-changes#habits#lifestyle
Share:WhatsAppXFacebook