Heart Health
राग आणि तुमचं हृदय : विज्ञान काय सांगतं?
राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण जर तुम्हाला heart, Diabetes किंवा BP ची समस्या असेल तर राग म्हणजे तुमच्या हृदयावर बॉम्ब ठेवण्यासारखं आहे!
1. Sympathetic Overdrive सुरू होतो. राग आल्यावर शरीरात Adrenaline, Noradrenaline, आणि Cortisol या stress hormones चा पूर येतो. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, Blood Pressure झपाट्याने वाढतो, आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.
2. Diabetes मध्ये: Blood Sugar Control बिघडतो. Cortisol insulin चं काम कमी करतं, ज्यामुळे अचानक sugar spike होतो.
3. High BP मध्ये: अचानक आलेला राग Stroke चा धोका वाढवतो. ज्यांचं BP आधीच अनियंत्रित आहे, त्यांच्यासाठी राग म्हणजे तात्पुरता hypertensive emergency.
4. Heart Disease मध्ये: राग म्हणजे हृदयाला धक्का. रागामुळे coronary arteries मध्ये संकुचन येऊ शकतं, angina वाढते, आणि Heart Attack चा धोका वाढतो.
तुम्ही काय करू शकता? घरच्या घरी करता येतील असे 5 उपाय:
1. Breathing (4-4-4-4): श्वास घ्या → थांबा → सोडा → थांबा. यामुळे vagal tone वाढतो आणि हृदय शांत होतं.
2. 5 मिनिटं चालत जा (Walking Meditation): चालताना फक्त श्वास आणि पायावर लक्ष द्या.
3. पाणी प्या, पण थोडं थोडं करून. थंडगार पाणी घशातून जाताना parasympathetic system activate होतो.
4. मधुर गाणी ऐका (Music = Dopamine). तुमच्या पसंतीची soothing गाणी ऐकली तरी Blood Pressure कमी होतो.
5. ‘ताबडतोब उत्तर देणं’ थांबवा. रागात बोललेलं 80% लोकांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो.
तुमचं स्वतःचं राग सांभाळण्याचं गुपित काय आहे? कृपया comment मध्ये लिहा.
राग ही मानवी भावना आहे, पण ती समजून घेतली आणि हाताळली तर तीच तुम्हाला वाचवू शकते. कारण राग दाखवणं हा एकमेव मार्ग नाही, तर स्मार्टली हाताळणं हा मार्ग तुमचं हृदय वाचवतो.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts