General Health
एका ब्रँडेड Human Albumin Injection ची गोष्ट
ही गोष्ट एका ब्रँडेड Human Albumin इंजेक्शनची आहे.
"पोस्ट थोडी सविस्तर आहे, पण शेवटपर्यंत वाचल्यास नक्कीच उपयोगी ठरेल."
एका रुग्णाची ICU मध्ये अत्यवस्थ स्थिती होती. दररोज इंजेक्शन्सची लांबलचक यादी होती.
एका दिवशी रुग्णाच्या नातेवाईकाचं लक्ष औषधांच्या बिलाकडे गेलं. त्यात एक इंजेक्शन — Human Albumin — किंमत ₹8000 होती! तो विचारतो, "हे एवढं महाग का?"
हॉस्पिटल मेडिकल स्टोअरचं उत्तर होतं, "हेच रूटीन आहे, सर्वच ठिकाणी हेच रेट आहेत."
पण नातेवाईक गप्प बसला नाही. तो बाहेरच्या मेडिकलमध्ये गेला. दुसऱ्या केमिस्टकडे तेच इंजेक्शन ₹5500 ला मिळालं! तो लगेच विकत घेतो आणि हॉस्पिटलमध्ये परततो.
हॉस्पिटल मेडिकलवाल्याला दाखवतो… तो म्हणतो, "हे वापरू शकत नाही, इथेच घ्यावं लागेल."
नातेवाईक म्हणतो, "ठीक आहे, पण हे सगळं कॅमेऱ्यावर बोला."
मेडिकलवाला गोंधळतो… आणि मग सांगतो — "तुमचं बाहेरचं इंजेक्शनही चांगलं आहे, पण आम्ही तेच इंजेक्शन ₹5000 ला देऊ — फक्त बाहेरचं परत द्या."
नातेवाईक पुन्हा बाहेरच्या स्टोअरमध्ये जातो. तेथे केमिस्ट आधी म्हणतो, "परत घेणार नाही."
थोड्या वेळाने counter offer — "₹4500 ला घ्या. किंवा जर हॉस्पिटल ₹4500 ला देत असेल, तर मी पूर्ण परत घेईन."
तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो… हॉस्पिटल म्हणतं, "ठीक आहे, ₹4000 ला देतो — फक्त बाहेरचं इंजेक्शन परत द्या."
अखेर नातेवाईक शहाणपणानं सांगतो – ‘ठीक आहे, पण हे ₹4000 आधीच्या ₹8000 बिलामधून adjust करा!‘
एकाच औषधासाठी — दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँडेड प्रॉडक्ट्स. जनरिक नाहीच.
पण किंमत, उत्तरं, आणि ऑफर्स — सगळंच बदलत जातं.
मी यावर भाष्य करणार नाही.
ही गोष्ट जशी घडली, तशीच सांगितली.
निर्णय आणि विचार, तुमचा.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts