Just For Hearts

Heart Health

थंडीच्या सकाळी श्वास घेण्यास त्रास होतोय का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

थंडीच्या सकाळी श्वास घेण्यास त्रास होत आहे का?

सकाळी उठल्यावर श्वास कोंडतोय, थोडं चालल्यावर दम लागतोय, किंवा सतत खोकला येतोय? जर असं होत असेल तर हा फक्त हंगामी त्रास नाही, तर तुमच्या फुफ्फुसांचं सावधगिरीचं लक्षण असू शकतं. थंडीमध्ये अशा तक्रारी COPD, Asthma, आणि Heart Failure असलेल्या रुग्णांमध्ये विशेषतः वाढतात.

थंडीमुळे श्वास का अडतो?

1. थंड हवा मुळे श्वासनलिका (airways) आकुंचन पावतात. श्वासनलिकांचे स्नायू थंडीत आकुंचन पावतात, ज्यामुळे दम लागतो. विशेषतः COPD, Asthma असलेल्या लोकांना जास्त त्रास होतो.

👉 स्वतःला विचारा: सकाळी उठल्यावर श्वास घेण्यास अडचण होते का?

2. हवेतील कोरडेपणा मुळे खवखव व खोकला होतो. थंड हवेमध्ये आर्द्रता कमी आणि कोरडेपणा वाढतो, परिणामी सायनस, सतत खोकला, नाक बंद होणे होते.

👉 स्वतःला विचारा: अंघोळीनंतर किंवा बाहेर गेल्यावर नाक खवखवते का?

3. थंडीचा हृदयावर परिणाम होतो, ज्यामुळे दम लागतो. रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि हृदयावर ताण येतो. Heart Failure असलेल्यांना याचा मोठा त्रास होतो.

👉 स्वतःला विचारा: थोडं चालल्यावर छातीत दडपण किंवा थकवा जाणवतो का?

4. झोपेत साचलेला कफ (Mucus) मुळे सकाळी श्वास अडतो. रात्री mucus श्वासनलिकांमध्ये साचतो, ज्यामुळे सकाळी दम लागतो आणि खोकला वाढतो.

👉 स्वतःला विचारा: सकाळी पहाटे खोकला अधिक होतो का?

5. धूळ, परागकण, धूरामुळे Allergy reactions होतात. थंडीच्या काळात घरात धूळ आणि परागकण वाढतात, ज्यामुळे नाक बंद, डोळे पाणावणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

👉 स्वतःला विचारा: थंडीमध्ये सर्दी, डोळे चुरचुरणे वारंवार होते का?

✅ थंडीमध्ये घ्यायची काळजी:

1. सकाळी गरम पाणी प्यावं आणि अंघोळ गरम पाण्यानेच करावी. 2. बाहेर जाताना मास्क वापरावा (नाक व तोंड झाकले जाईल अशा पद्धतीने). 3. COPD, Asthma असल्यास Inhaler/Nebulizer वेळेवर वापरावा. 4. श्वसन व्यायाम करावेत (उदा. श्वासावर नियंत्रण, Balloon फुगवणे, भ्रामरी). 5. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांमध्ये बदल करावा. 6. तापमानानुसार घरातील वाफेची काळजी घ्यावी. 7. AC ऑफिसमध्ये humidifier किंवा पाणी जवळ ठेवा.

📌 लक्षात ठेवा: "थंडीचा त्रास फक्त ऋतू बदलाचा भाग नाही, तो तुमच्या श्वसन आणि हृदयाच्या आरोग्याचं संकेतही असू शकतो!"

श्वासाचा त्रास वारंवार जाणवत असेल तर विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#breathing-difficulty#cold-weather#copd#asthma#heart-failure#winter-care#respiratory-health
Share:WhatsAppXFacebook