Just For Hearts

Nutrition

गाईचे दूध की म्हशीचे?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

गाईचे दूध की म्हशीचे?

1. गाईचे दूध: पातळ, फिकट पांढरं, फॅट कमी (3–4%), पचायला हलकं.

लहान मुलं, वृद्ध, वजन कमी करणारे, अ‍ॅसिडिटी असणाऱ्यांसाठी योग्य.

2. म्हशीचे दूध: जाडसर, दाट, फॅट जास्त (6–8%).

ताकद देतं, पण पचायला जड.

मेहनती लोक, वजन वाढवायचं असलेल्यांसाठी उपयुक्त.

3. अ‍ॅसिडिटी, झोपेचा त्रास, पोट फुगणं, वजन वाढत असल्यास म्हशीचं दूध मर्यादित करा किंवा गाईच्या दुधाचा वापर करा.

4. गाईचे दूध शरीर शांत करतं – उष्ण प्रकृती असणाऱ्यांना जास्त फायदेशीर.

5. म्हशीचे दूध पचायला वेळ घेतं म्हणून रात्री घेणं टाळावं.

6. कधी दूध घेतल्यावर जड वाटतं, झोप लागत नाही, पोट दुखतं हे संकेत दुर्लक्ष करू नका.

दूध चांगलं की वाईट हे दूध नाही, तुमचं शरीर ठरवतं.

"शुद्ध दूध म्हणजे आरोग्य, पण योग्य दूध म्हणजेच समाधान!"

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#milk#health-tips#nutrition#digestion#acidity#weight-management
Share:WhatsAppXFacebook