Just For Hearts

Diabetes

'Diabetes Reversal' जाहिरातींचा धोका

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आजकाल diabetes पेक्षा “Diabetes reversal” च्या जाहिरातींचा धोका जास्त आहे.

OPD मध्ये second opinion साठी 65 वर्षांची एक महिला रुग्ण आली. तिने सांगितले की ती आमच्या WhatsApp लेख वाचून आली आहे.

तिच्या हातात मोठी file होती. इतकी जाड की उघडतानाच कळत होतं की गेल्या काही महिन्यांत ती treatment पेक्षा जास्त confusion मध्ये गेली आहे.

Reports, supplements, smoothies, powders, कठीण diet charts, दर 2 तासांनी काहीतरी खायची यादी—या सगळ्यामुळे रुग्ण पूर्णपणे थकलेली होती.

मी शांतपणे file पाहत होतो, तेव्हा ती अचानक म्हणाली, “Doctor, diabetes manage करायचा आहे की पूर्ण दिवस त्याचाच विचार करत बसायचं आहे?”

त्या एका वाक्यात खूप frustration होती.

थोड्या वेळाने file मधल्या एका पानावर नजर गेली, ज्यावर “Diabetes Freedom Program” आणि ₹40,000, ₹55,000, ₹70,000 असे पैसे लिहिले होते.

मी विचारले, “हे काय आहे?”

ती म्हणाली, “इतके पैसे खर्च केले, पण आता वाटतं diabetes पेक्षा त्याच्या भीतीने जास्त दमले आहे.”

खरं सांगायचं तर हे नवीन नाही.

“Reverse करा,” “Freedom मिळवा,” “Permanent cure,” “Last chance” अशा जाहिरातींमुळे रुग्णांना वाटायला लागतं, “आता लगेच काहीतरी मोठं केलं नाही तर उशीर होईल.”

मी तिला शांतपणे एकच सांगितलं, “Diabetes हा panic करण्याचा आजार नाही, तो समजून घेण्याचा आजार आहे.”

हो, discipline लागतं पण drama लागत नाही.

Simple घरचं जेवण, थोडं नियमित चालणं, झोप, Weight वर लक्ष, Tracking आणि patience.

हे boring वाटू शकतं, पण हीच एकमेव योग्य पद्धत आहे!

ती file बंद करताना मी हसत म्हणालो, “Diabetes ला complicated करू नका, Keep it simple and stupid.”

ती शांतपणे म्हणाली, “हे आधी कुणीतरी सांगायला हवं होतं.”

(खऱ्या clinical घटनांवर आधारित)

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#diabetes-reversal#lifestyle#patient-care#health-awareness
Share:WhatsAppXFacebook