Lifestyle
देवरिया ताल Trek: उत्तराखंडमधील शांततामय सहल
देवरिया ताल Trek
उत्तराखंडच्या थंडगार, शांत डोंगरातला एक शांततामय ब्रेक.
ट्रेकदरम्यान आम्हाला ग्राम सरी, ब्लॉक उखीमठ, जिल्हा रुद्रप्रयाग येथील प्रधान तसेच सचिव यांची भेट झाली. त्यांनी त्यांच्या गावातील राष्ट्रीयगीत "Vande Mataram" च्या १५० वर्षांच्या उत्सवात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं.
नंतर त्यांनी त्या कार्यक्रमाचा वृत्तांत स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित resources असूनही, या लोकांचे आदरातिथ्य १ नंबर आहे!
भारताच्या राष्ट्रीयगीत "Vande Mataram" च्या १५० वर्षांच्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता पंचायत भवनात मा. ग्राम प्रधान श्रीमती अनिता देवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक गायन करण्यात आले.
गायन कार्यक्रमात ममंद अध्यक्ष विनिता देवी, वार्ड सदस्य भारत भट्ट, हनुमंत नेगी, प्रेम देवी, कुलदीप लाल, माजी प्रधान गुड्डी देवी, रौली देवी, बरदेई, सौणी देवी, कुशला देवी, चैता देवी, नौमी देवी तसेच पुणेहून आलेले पर्यटक डॉ. रविंद्र कुलकर्णी, डॉ. मनिषा देवकर, मनोज बडणे, दिल्लीहून राहुल आणि आंगनवाडीतील मुले सहभागी होते.
नेहमीच्या रुटीनमधून बाहेर पडा...
नवीन ठिकाणं शोधा, नवा अनुभव घ्या.
काम संपत नाही, पण आयुष्य निघून जातं. थांबा, फिरा, स्वतःला वेळ द्या.