Just For Hearts

Heart Health

झोपताना दम लागतो? लक्ष देण्यासारखे लक्षण

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

तुम्हाला झोपताना दम लागतो का? उशी वाढवल्याशिवाय झोप येत नाही का? सावधगिरी बाळगा!

काही रुग्ण सांगतात: “डाव्या कुशीवर झोपले की छातीत जडपणा वाटतो…” “सरळ झोपलो की छाती दडपते… उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही…” “रात्री उठून बसावं लागतं, नाहीतर गुदमरल्यासारखं होतं…”

हे लक्षण Orthopnea म्हणून ओळखले जाते आणि Congestive Heart Failure मध्ये दिसते. हृदय नीट पंप करू शकत नाही, त्यामुळे फुफ्फुसात पाणी साचते आणि छातीत दडपण होते.

दिवसात दम लागत नाही पण रात्री दम लागतो? → ही Masked Heart Failure ची खूण असू शकते. रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी अनुभवी डॉक्टर तपासणीवरून हे ओळखू शकतो.

जर तुम्हाला झोपताना जास्त उशी लागत असेल, तर ती फक्त सवय नाही, तर हृदयाच्या थकव्याची सावध सूचना असू शकते.

जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचितांना हे लक्षण जाणवत असेल, तर हा पोस्ट शेअर करा. हे फक्त थकवा नाही, तर हृदयाचा इशारा असू शकतो!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-failure#orthopnea#breathlessness#congestive-heart-failure#heart-health
Share:WhatsAppXFacebook