Mental Wellness
दिवसभर OPD, ward, ICU मध्ये...
दिवसभर OPD, ward, ICU मध्ये… रुग्ण, नातेवाईक, त्यांच्या तक्रारी, भीती, प्रश्न… हे सगळं ऐकून बाहेर पडताना मनात एकच विचार येतो की लोक आयुष्य इतकं rigid पणे का जगतात?
Travel / प्रवास करताना आपण किती वेगळे असतो. योजना बदलतात, उशीर होतो, मतभेद होतात, थकवा येतो… तरी आपण adjust करतो, सोडून देतो, पुढे जातो. कारण मनात कुठेतरी मान्य असतं की हा प्रवास आहे. सगळं आपल्या हातात नसणार.
पण आयुष्यात? इथे प्रत्येक गोष्ट perfect हवी असते. लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागायला हवेत. परिस्थिती control मध्ये हवी असते. उद्या काय होणार ते आधीच ठरलेलं हवं.
मला वाटतं, लोक एक गोष्ट विसरतात की आपण सगळेही या पृथ्वीवरच्या एका प्रवासात आहोत. फरक एवढाच की इथे destination कुणालाच माहीत नाही.
जीवन–मृत्यूच्या अगदी जवळ काम करणारा तसेच प्रवासात रमणारा माणूस म्हणून मला हे रोज जाणवतं.
जर आपण आयुष्यालाच थोडंसं travel सारखं पाहिलं, थोडं accommodative झालो, थोडं सोडलं, थोडं समजून घेतलं… तर ताण कमी होईल, नाती हलकी होतील.
कारण पुढच्या वळणावर काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही.
म्हणून आज तरी थोडं rigid होणं सोडा. थोडं accommodative व्हा. लोकांना, परिस्थितीला, आणि स्वतःलाही थोडी जागा द्या.
Life काही जिंकायची स्पर्धा नाही. आणि सगळं आपल्या control मध्ये ठेवायची गोष्टही नाही.
Life म्हणजे फक्त माणसांसोबत, क्षणांसोबत चालत, थोड्या सौम्यपणे पुढे नेत जगायची गोष्ट आहे.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी, MD DNB FSCAI Cardiology