Just For Hearts

Lifestyle

ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. 14 मधील emergency admission चा दिवस

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. 14 मध्ये emergency admission चा दिवस मला २५ वर्षांपूर्वीच्या residency च्या दिवसांची आठवण करून देतो. शेकडो पेशंट्स, वॉर्ड्स तुडुंब भरलेले, अगदी floor beds सुद्धा वापरले जात होते!

तरीही एक अलिखित नियम होता: कोणताही पेशंट expire झाला की, तो बेड २४ तास रिकामा ठेवायचा आणि मगच दुसऱ्या पेशंटसाठी वापरायचा. हा नियम कोणत्याही circular मध्ये लिहिलेला नव्हता, पण प्रत्येक resident त्याचे पालन करत असे. हा मृत व्यक्तीसाठी दिलेला एक अलिखित सन्मान आणि श्रद्धांजली होती.

आज जेव्हा हॉस्पिटल्सचा USP म्हणजे बेड्सची संख्या असते, patient care पेक्षा occupancy rates मोजली जातात, आणि रिकामे बेड म्हणजे "efficiency कमी" समजले जाते, तेव्हा हा नियम वेडेपणासारखा वाटू शकतो. पण तेव्हा श्रद्धा होती, आज system आहे. तेव्हा माणूस 'पेशंट' होता, आज तो 'कस्टमर' आहे.

तेव्हा एक बेड २४ तास रिकामा ठेवून आदर दिला जायचा. आज वॉर्ड भरलेले असतात, पण माणसांसाठी वेळ आणि आदर रिकामेच राहतात.

ही आठवण मी आज शेअर करतो कारण काही गोष्टी policies नसतात, त्या संस्कार असतात. काही शिस्त नियमांमधून येत नाही, त्या मनापासून जपल्या जातात. आणि हीच माणुसकीची जागा आपण अजून जपली पाहिजे, रिकामी ठेवलेली का असेना!

#emergency-admission#sassoon-hospital#patient-care#hospital-beds#medical-ethics#residency#humanity
Share:WhatsAppXFacebook