Mental Wellness
शरीरासाठी व्यायाम, पण मनासाठी छंद हवेच
आपण आहार, व्यायाम, औषधं या गोष्टी आरोग्यासाठी करतो, पण मन, भावना आणि मेंदूच्या आरोग्याचं काय?
साध्या छंदांमुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यात सकारात्मक बदल घडतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध आहे!
छंद आणि त्याचे आरोग्य फायदे थोडक्यात:
1. चित्रकला / रंगकाम : स्ट्रेस कमी होतो, मन शांत होते 2. वाचन : मेंदूची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते 3. संगीत ऐकणं / शिकणं : मूड सुधारतो, झोप चांगली होते 4. बागकाम / कुंडीत झाडं : Vitamin D मिळतो, हलका व्यायाम होतो, Blood Pressure कमी होतो 5. नवे पदार्थ बनवणं : सर्जनशीलता वाढते, कुटुंबात संवाद वाढतो 6. कृतज्ञतेचं लेखन : मनोबल वाढतो, नकारात्मकता कमी होते 7. प्रार्थना / ध्यान / संवाद : तणाव कमी होतो, मन स्थिर होते 8. जुने फोटो / आठवणी : Dopamine वाढतो, भावनिक समतोल टिकतो
एक साधा छंद तुमचं मानसिक, भावनिक आणि neurological आरोग्य सुधारू शकतो. औषधांपेक्षा कमी खर्चात आणि अधिक समाधानात!
तुमचा असा कोणता छंद आहे जो तुम्हाला आतून हलका आणि आनंदी ठेवतो? कमेंट करा आणि कुणालातरी नवा आरंभ करायला मदत करा!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts