Liver Health
Fatty Liver कुणासाठी आजार ठरतो… आणि कुणासाठी नाही?
(या विषयावर 3 पोस्टची मालिका - भाग 2)
1. प्रत्येक Fatty Liver ला औषधांची गरज नसते. पण प्रत्येक Fatty Liver ला clinical judgement लागते. 2. Fatty Liver सोबत कंबरभोवती चरबी, triglycerides जास्त, HDL कमी, BP किंवा prediabetes असेल, तर तो metabolic Fatty Liver मानला जातो. 3. अशा लोकांमध्ये Fatty Liver हा future Diabetes आणि Heart Disease चा सगळ्यात पहिला visible marker असतो. 4. उलट, एखाद्याला ultrasound मध्ये incidental Grade 1 Fatty Liver दिसतो, बाकी reports normal असतील, तर panic करण्याची गरज नसते. 5. ALT (Liver Enzyme) जास्त असणं नेहमी seriousness दाखवत नाही आणि ALT normal असणं सुरक्षिततेची हमी देत नाही. 6. खरा प्रश्न असा आहे: Liver fat साठवत आहे की fat वापरण्याची क्षमता कमी झाली आहे? 7. Muscle mass कमी असेल तर Sugar आणि Fat दोन्ही शेवटी Liver कडेच जातात. 8. म्हणून Exercise फक्त “calorie burn” नसून Metabolism योग्य दिशेने वळवण्यासाठी असतो.
हे वाचताना स्वतःला विचारा: “मी वजन कमी करण्यासाठी चालतोय की माझे Muscles वापरण्यासाठी?”
अशाच छोट्या निरीक्षणांवर आम्ही आमच्या Just For Hearts ह्या YouTube channel वर step-by-step मार्गदर्शन करत असतो.
उद्या शेवटचा भाग: Fatty Liver दुर्लक्षित राहिलं तर शरीरात पुढे काय sequence सुरू होतो? तुमचे प्रश्न comment मध्ये ठेवा, सगळे घेऊ.