Diabetes
ताप, उलटी, infection… आणि Diabetes? Sick Day Rule काय आहेत?
ताप, उलटी, infection… आणि Diabetes?
Sick Day Rule
• Sugar 4–6 तासांनी तपासा. आजारी असताना sugar पटकन बदलू शकते.
• Diabetes औषध स्वतःहून बंद करू नका. Metformin, DPP4 inhibitors (Teneligliptin / Sitagliptin), insulin बहुतेक वेळा चालू ठेवावी लागतात.
• उलटी, जुलाब किंवा कमी पाणी पिण्यामुळे होणाऱ्या dehydration मध्ये काही medicines (Dapagliflozin) तात्पुरते थांबवावी लागतात.
• पाणी आणि fluids वाढवा. लहान लहान घोटांनी का होईना dehydration टाळा.
• जेवण होत नसेल तरी पूर्ण उपाशी राहू नका. सूप, दही, पातळ खिचडी, नारळ पाणी चालेल.
• Insulin चालू असल्यास बहुतेक वेळा चालू ठेवावं लागतं. आजारी असताना sugar अनेकदा वाढते.
• Sugar खूप जास्त असल्यास urine / blood ketone तपासणी विचारात घ्या.
• खालील symptoms असल्यास डॉक्टरांशी संपर्क करा: - sugar >250 mg/dL सतत - सतत उलटी / vomiting - जास्त अशक्तपणा / confusion - fluids / पाणी पिणं शक्य नसणं
• Severe illness मध्ये delay करू नका. hospital evaluation गरजेचं असू शकतं.
तुम्हाला Diabetes Sick Day Rule आधी माहिती होता का?
👍 हो, माहिती होतं 🤔 ऐकलं होतं पण नीट माहित नव्हतं 😮 आज पहिल्यांदाच समजलं
हा पोस्ट इतर diabetic रुग्णांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. उपयुक्त वाटला तर forward जरूर करा.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts