Just For Hearts

Lifestyle

Diabetic आणि Heart patients साठी Fiber म्हणजे ‘natural medicine’ पण Plate वर तेच नसतं

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Diabetic आणि Heart patients साठी Fiber म्हणजे ‘natural medicine’ पण Plate वर तेच नसतं.

दररोज 25–35 gm dietary fiber लागतो, पण बहुतांश भारतीयांचं intake फक्त 10–12 gm आहे. या Missing Fiber मुळे पचन, वजन, साखर, कोलेस्टेरॉल आणि immunity बिघडते.

Fiber चे 6 फायदे: 1. साखर आणि BP नियंत्रणात ठेवतो: Soluble fiber glucose absorb कमी करतो आणि sodium retain होणंही कमी करतो, ज्यामुळे Sugar आणि BP control होतो. [Ref: ADA, JACC, 2023]

2. Weight loss साठी Fiber = Natural Satiety: Fiber-rich जेवण केल्यानंतर calorie intake 200–300 kcal ने कमी होते. [Ref: Harvard School of Public Health]

3. LDL कोलेस्टेरॉल कमी करतो आणि हृदयाचं रक्षण करतो: Soluble fiber bile acids शी bind होतो, ज्यामुळे liver ला extra cholesterol वापरावं लागतं. [Ref: American Heart Association]

4. पचन सुधारतो आणि acidity कमी करतो: Fiber constipation, bloating आणि gas वर प्रभावी आहे.

5. Gut microbiome support करतो, ज्यामुळे immunity आणि hormones बळकट होतात: Fiber prebiotic fuel म्हणून काम करतो, ज्यामुळे mood आणि मन सुधारतो.

6. जीवनशैलीवर आधारित lifestyle diseases चा धोका कमी करतो: Type 2 Diabetes, fatty liver, colorectal cancer आणि heart failure चा risk कमी होतो.

रोजच्या आहारात Fiber वाढवण्याचे सोपे उपाय: - पोळीच्या पिठात flaxseed किंवा oats bran घाला. - प्रत्येक जेवणात 2 वाट्या भाज्या, उसळ किंवा सूप घाला. - Apple आणि Orange त्वचेसह खा; juicing किंवा straining टाळा. - चहा सोबत biscuits नको; त्याऐवजी भिजवलेली हरभरा उसळ खा. - Ready-to-eat products कमी करा; घरचं unprocessed जेवण जास्त करा.

Fiber कमी असल्यास काय होते? - वारंवार भूक आणि cravings - साखर spikes - पचनबिघाड आणि acidity - लठ्ठपणा, fatty liver, PCOD, depression - शरीर detox नीट होत नाही

Fiber हे पर्यायी नाही, तर medicinal आहे. "सिंपल जेवणातही Fiber चं भांडार असू शकतं, पण तो विचार doctor आणि patient दोघांनी करायला हवा."

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#fiber#diabetes#heart-health#nutrition#weight-loss#cholesterol#digestion#immunity
Share:WhatsAppXFacebook