Just For Hearts

Mental Wellness

Gen Z मध्ये भावनिक कमकुवतपणा नाही, पण व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा कमी आहे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आज थिएटरमध्ये तरुण रडताना दिसतोय ‘Saiyaara’ बघून. ते दृश्य, तो आजार नाही, तर त्यांच्या स्वतःच्या मनात दडलेल्या वेदनेवर आहे. मनातलं जे कधीच कोणासमोर मोकळं झालं नाही, ते आता डोळ्यांतून बाहेर पडत आहे.

ही पिढी भावनाशून्य नाही, ती फक्त ‘सेफ स्पेस’ शिवाय मोठी होत आहे. व्यक्त होण्यासाठी कुठेही ठिकाण नाही, जिथे कोणीतरी फक्त ऐकून घेईल – न उपदेश, न टीका.

आणि तेव्हा एखादा सिनेमा समोर येतो आणि मनातलं सगळं उघड करत जातो.

कधी ब्रेकअप, कधी हरवलेली ओळख, कधी ‘माझं कोणी आहे का?’ हा न सांगता आलेला प्रश्न.

Saiyaara ही फक्त प्रेमकथा नाही – ती एका पिढीच्या आतल्या गोंधळाचा आरसा आहे.

तरुण मित्रांसाठी : तुम्ही कमकुवत नाही. भावना दडवणं म्हणजे ताकद नाही – वेळीच बोलणं, व्यक्त होणं ही खरी हिंमत आहे. कोणीतरी असतं – मित्र, सल्लागार, पालक – जो फक्त ऐकतो आणि समजतो.

आणि आपल्यापैकी जे पालक, मार्गदर्शक आहेत – त्यांच्यासाठी एक विनंती: “समजावण्याआधी थोडं ऐकणं” – हाच खरा संवाद असतो. पिढ्यांमध्ये दरी नको, नातं हवं – आणि त्यासाठी सहवेदना गरजेची आहे.

Saiyaara आठवण करून देतो की जे OK दिसतं, ते आतून हरवलेलं असू शकतं. आणि कधी कधी फक्त एक वाक्य हवं असतं – “मी आहे तुझ्यासोबत.”

आजचा खरा प्रश्न – आपण कुणासाठी ‘ऐकणारं ठिकाण’ आहोत का?

#gen-z#emotional-health#mental-wellness#parenting#safe-spaces#listening#empathy
Share:WhatsAppXFacebook