Heart Health
सकाळी डिस्चार्ज दिला तरीही आजोबा रात्रभर हॉस्पिटलमध्ये होते
९० वर्षांचे आजोबा – २ दिवसांपूर्वी यशस्वी angioplasty झाली होती. सकाळी discharge प्रोसेस सुरू केली, पण insurance, कागदपत्रं, हॉस्पिटल formalities मुळे दिवस गेला.
रात्री उशिरा राउंड घेताना ते अजूनही ward मध्ये होते – हसतमुख, शांत. म्हणाले, “सर, एक फोटो काढूयात का… तुमच्या आठवणी ठेवायच्या आहेत!”
तो फोटो क्लिक झाला, पण त्याआधी एक गोष्ट क्लिक झाली - डॉक्टर–रुग्ण यांच्यातील विश्वास.
आज सिस्टिम क्लिष्ट आहे, वेळ कमी आहे, तक्रारी खूप आहेत, पण सगळं बिघडलंय असंही नाही.
जेव्हा ९० वर्षांचे रुग्ण आणि त्यांचं कुटुंब समाधानानं, विश्वासानं जातं, तेव्हा वाटतं की अजूनही काही गोष्टी खरंच योग्य चालल्या आहेत.
दिवसभराच्या व्यस्त schedule मध्ये अशा क्षणांनी मन शांत होतं – कारण औषधं देणं हे काम असेल, पण विश्वास देणं ही जबाबदारी आहे… आणि ती नॉन-नेगोशिएबल आहे.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts