Just For Hearts

Mental Wellness

Gratitude : एक दुर्लक्षित पण प्रभावी उपचार

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Gratitude हा पर्याय नाही; तो एक उपचार आहे.

आजारी असतानाही, जर आपण कायासाठी आभार मानायचे हे ठरवलं तर जीवनात समाधान मिळू शकतं.

Gratitude चे 5 वैज्ञानिक फायदे:

1. Cortisol कमी होतो आणि Immunity वाढते: सततच्या तक्रारी Stress Hormone वाढवतात. Gratitude Cortisol कमी करून शरीराला शांत ठेवतो.

2. Heart Rate, Sleep आणि Blood Pressure सुधारतो: Gratitude करणाऱ्या रुग्णांमध्ये हृदय आणि Blood Pressure नियंत्रित राहतात.

3. Depression आणि Anxiety ला नैसर्गिक आळा: 21 दिवस रोज फक्त 5 गोष्टींसाठी आभार मानले तरी मानसिक स्थिती सुधारते.

4. उपचारात सहकार्य वाढते: Gratitude mindset असलेल्या रुग्णांचा recovery rate चांगला असतो.

5. Caregiver चं Emotional Burnout कमी होतो: Appreciation चे शब्द त्यांचं मनोबल वाढवतात.

ही कृती खूप सोपी आहे पण परिणाम खोलवर आहेत:

- रोज फक्त 3 गोष्टी लिहा, जसे “आज चांगली झोप झाली”, “Sugar normal होती”, “मुलांशी संवाद झाला”.

- Caregiver साठी: “आज पेशंट हसला”, “भाजी खाल्ली”, “कणखर वाटलं” हेही मोठं आहे.

कधी कधी, डॉक्टरांसाठी एक साधा “Thank you” देखील खूप महत्त्वाचा असतो.

जर रुग्ण किंवा कुटुंबियांना वाटत असेल की त्यांचं आयुष्य बदललं आहे, तर मनापासूनचा “Thank you, Doctor” तुमचं आणि आमचं नातं अधिक अर्थपूर्ण करतो.

उपचारात सकारात्मकता, ऐकून घेतलेलं मन, चुकीशिवाय दिलेला आधार हेही healing चा एक टप्पा असतो.

"रोग आहे, पण तोच फोकस का असावा? शरीरात जे काही ठीक आहे, त्याची नोंद घेतली का?"

Gratitude म्हणजे नकारात्मक गोष्टी झाकणं नाही, तर आपल्याकडे जे आहे ते पूर्ण ताकदीनं वापरणं.

आजपासून सुरुवात करा:

रोज एका डायरीत 3 गोष्टी लिहा ज्यासाठी मनापासून आभार वाटतात. कधी डॉक्टर, कधी Caregiver, कधी स्वतःलाच पण लिहा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#gratitude#mental-wellness#stress-relief#heart-health#caregiver-support#positive-mindset
Share:WhatsAppXFacebook