Mental Wellness
Guilt: ICU मधील न बोललेली वेदना
Guilt: पश्चात्ताप / अपराधीपणा
ICU मध्ये दिसणारी ‘न बोललेली वेदना’.
“Doctor… काहीतरी चुकलं का आमचं?”
हा प्रश्न अनेकदा शब्दांत नसतो, पण ICU मध्ये तो चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
रुग्ण श्वास घेत असतो, पण त्याच्या जवळ बसलेले नातेवाईक एका वेगळ्या त्रासात असतात:
Guilt - अपराधीपणा, पश्चात्ताप, आणि एक न बोललेलं दु:ख.
असा हा Guilt जाणवतो तरी कसा? * डोळ्यांत ओलसर शांतता, बोलायचं पण न बोलू शकणं. * नकळत झालेली कबुली - “काळजी घ्यायला हवी होती…” * सावध स्पर्श – जणू काही शेवटची वेळ आहे. * एकमेकांकडे पाहून चूक शोधणं “कोणी काही लक्ष दिलं का?”
Guilt कशामुळे? * ती चाचणी, जी पुढे ढकलली. * ती वेळ, जी काढता आली असती. * तो सल्ला, जो ऐकला नाही. * ती एक भेट, जो संवाद, जे कधी घडलंच नाही.
Guilt हा आजाराने नाही, तर वेळ न देता जगण्याच्या गोंधळाने तयार होतो.
तो दोष नाही पण तो ‘सत्य’ आहे. आणि तो रोज ICU मध्ये दिसतो… शब्दांशिवाय.