Just For Hearts

Heart Health

काम आवडीचं आहे तरी 14 तास बसून केल्याने काय होऊ शकतं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

खूप professionals विचारतात, “मला माझं काम आवडतं आणि मला स्ट्रेस नाही. मग 14 तास बसून केल्याने काय बिघडतं?”

हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मी स्पष्ट सांगतो: दीर्घकाळ बसणं अनेक आजारांचं मूळ ठरू शकतं. तुमचं काम आवडत असलं तरी शरीराला हालचाल हवीच आहे!

दीर्घकाळ बसण्याचे शरीरावर होणारे 5 धोके:

1. रक्तप्रवाह मंदावतो यामुळे पाय सुजणे, थकवा आणि Deep Vein Thrombosis (DVT) चा धोका वाढतो.

2. साखर व चरबीचं नियमन बिघडतं दीर्घकाळ बसल्याने Hyperinsulinemia आणि pre-diabetes वाढू शकतो.

3. Lipoprotein Lipase कमी होतो हा enzyme चांगल्या fat metabolism साठी अत्यंत गरजेचा आहे.

4. Blood Pressure control वर परिणाम होतो चुकीच्या posture मुळे autonomic control बदलतो, ज्यामुळे Blood Pressure वर परिणाम होतो.

5. दर 1 तास बसल्यावर हृदयविकाराचा धोका 10% ने वाढतो.

उपाय: थोडं-थोडं हलणं म्हणजे मोठा Investment! - प्रत्येक 30–45 मिनिटांनी फक्त 2 मिनिटं चालणं circulation आणि cognitive performance सुधारते. - स्टँडिंग ब्रेक्स घ्या, फोनवर चालता चालता बोलणं करा, टाइमर लावून reminders ठेवा. - काम आवडत असलं तरी दररोज शरीराला activity ची गरज असते.

आम्ही लवकरच Remote Tracking + Expert Guidance सुरू करत आहोत, ज्यामुळे हळूहळू पण कायमस्वरूपी Lifestyle बदल शक्य होतील.

सवयी समजल्या की सुधारणा शक्य होते! इच्छुक असाल तर WhatsApp Channel join करा.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-health#sedentary-lifestyle#blood-circulation#diabetes-prevention#blood-pressure#fat-metabolism#lifestyle-change
Share:WhatsAppXFacebook