Just For Hearts

Heart Health

माझा कोलेस्टेरॉल नॉर्मल असूनही Heart Attack का होतो?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

तुमचा कोलेस्टेरॉल नॉर्मल असूनही Heart Attack का होतो?

1. ‘नॉर्मल’ रिपोर्ट म्हणजे सुरक्षित नाही. कोलेस्टेरॉलचा रिपोर्ट बरा दिसतो, पण Small Dense LDL particles वाढलेले असतील, तर धोका तसाच असतो. हे कण जास्त ‘sticky’ असतात आणि आर्टरी ब्लॉक करतात.

2. शरीरातली ‘Inflammation / दाह / जळजळ’ - Silent Killer! CRP (C‑Reactive Protein), Homocysteine यांसारख्या चाचण्या जळजळीचं पातळी दाखवतात. रिपोर्ट नीट असला तरी शरीर ‘on fire’ असू शकतं.

3. Plaque rupture म्हणजेच संकट. ब्लॉकेज 40% असली तरी ती ‘फुटली’ की clot तयार होतो आणि अचानक Heart Attack येतो. म्हणूनच “नंबर नव्हे, Stability महत्त्वाची!”

4. तणाव आणि झोप हे दुर्लक्षित जोडीदार. दररोजचा मानसिक तणाव, झोपेची कमतरता ही sympathetic overdrive वाढवतात. BP, sugar, clotting वाढते आणि Heart Attack चा धोका अनेक पटींनी वाढतो.

5. केवळ कोलेस्टेरॉल नव्हे, Multifactorial Risk बघा. Diabetes, triglycerides, Lp(a), obesity, inactivity हे सगळं मिळूनच धोका ठरवतात. एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं, तरी चित्र अपूर्ण राहतं.

तुमचा रिपोर्ट “ठीक” आहे का “अपूर्ण”?

तुम्हाला या सर्व चाचण्या माहित होत्या का? तुमचे अनुभव आणि प्रश्न खाली नक्की शेअर करा, पुढील काही पोस्टमध्ये यावर चर्चा करू.

हा पोस्ट आपल्या कुटुंबीय, मित्रांसोबत नक्की forward करा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-attack#cholesterol#ldl#inflammation#stress#plaque-rupture#multifactorial-risk
Share:WhatsAppXFacebook