Heart Health
हृदयविकाराचा झटका: काय करायचं जेव्हा तो होतो
हृदयविकाराचा झटका अचानक येऊ शकतो, ज्यामुळे छातीत जोरदार दुखणे, घाम येणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. तुमच्या नातेवाईकाला असे लक्षणे दिसल्यास त्वरित आणि शांतपणे कृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर आणि सामान्य नागरिकांसाठी खालील टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन:
1. तातडीने रुग्णालयात पोहोचा. लक्षणे सुरू झाल्यापासून पहिला तास “Golden Hour” म्हणतात. या वेळेत रुग्णालयात गेल्यास हृदय वाचण्याची शक्यता ८०% पेक्षा जास्त असते.
2. डॉक्टरांशी संपर्क असल्यास आणि हृदयविकाराचा संशय असल्यास, रुग्णाला Dispersible Aspirin ३२५ mg तोंडात ठेवून चघळवा.
3. रुग्णालयात पोहोचल्यावर त्वरित ECG आणि Troponin चाचण्या करा. या चाचण्यांमुळे हृदयविकाराचा प्रकार स्पष्ट होतो.
4. दोन मुख्य उपचार पर्याय:
- Thrombolysis (TPA injection): • रुग्णालयात Streptokinase, Tenecteplase किंवा Alteplase इंजेक्शन दिले जाते जे रक्तातील clot विरघळवते. • यशस्वी होण्याचा दर ५०-७०% आहे. • खर्च ₹३००० (Streptokinase) ते ₹३०,०००+ (Alteplase/TPA) पर्यंत असतो.
- Primary Angioplasty (उपलब्ध असल्यास सर्वोत्तम): • रुग्णाला लगेच Cath Lab मध्ये नेऊन blockage काढून stent टाकतात. • यशस्वी होण्याचा दर ९०-९५% आहे. • खर्च ₹१.५ लाख ते ₹२.५ लाख (stent प्रकार आणि हॉस्पिटलवर अवलंबून). • आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले योजनेत काही हॉस्पिटल्समध्ये मोफत किंवा कमी दरात उपलब्ध.
5. Angioplasty शक्य नसेल तर Thrombolysis त्वरित करा. ग्रामीण भागात किंवा Cath Lab नसलेल्या हॉस्पिटलमध्ये Thrombolysis हा एकमेव पर्याय असतो. नंतर आवश्यक असल्यास Rescue Angioplasty केली जाते.
6. हॉस्पिटलमध्ये ४-५ दिवस राहावे लागते. Stent टाकल्यावर १-२ दिवस ICU मध्ये आणि नंतर general ward मध्ये राहावे लागते.
7. पुढील काळजीमध्ये औषधे, आहार आणि Cardiac Rehab यांचा समावेश असतो. आयुष्यभर blood thinners (Ecosprin, Clopidogrel), Blood Pressure आणि Sugar नियंत्रण, lipid-lowering medicines (statins) आवश्यक असतात. Lifestyle सुधारल्यास भविष्यातील हृदयविकार टाळता येतो.
8. Cardiac Rehab आवश्यक आहे पण दुर्लक्षित आहे. चालणे, श्वासाचे व्यायाम, आहार आणि मानसशास्त्र यांचा समावेश असतो. वैज्ञानिकदृष्ट्या हे भविष्यातील हृदयविकार कमी करण्यास मदत करते. Just For Hearts सारखे वर्षभर चालणारे monitoring programs फार उपयोगी आहेत.
9. घाबरू नका पण वेळ वाया घालवू नका. Ambulance अडकल्यामुळे, डॉक्टर मिळेपर्यंत वेळ गेल्यामुळे किंवा इंजेक्शन न मिळाल्यामुळे होणाऱ्या चुका टाळा. नातेवाईकांनी CPR शिकणेही उपयुक्त आहे.
10. हृदयविकार टाळण्यासाठी Blood Pressure, Diabetes आणि Cholesterol नियंत्रणात ठेवा. ९०% हृदयविकार lifestyle-related असतात. दिवसातून ३० मिनिटे चालणे, सकस आहार आणि नियमित तपासणी हे खरे उपाय आहेत.
हा पोस्ट सर्व कुटुंबांमध्ये आणि ग्रुप्समध्ये share करा. आपत्कालीन परिस्थितीत विचार करण्यासाठी वेळ नसतो, हे ज्ञान जीव वाचवू शकते.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts