Heart Health
दररोज किती मीठ 🧂 घ्यावं?
तुम्हाला माहितेय का मीठ हा हृदयविकार, Blood Pressure (BP) आणि सूज वाढवणाऱ्या दैनंदिन सवयींपैकी नंबर 1 आहे?
गेल्या 25 वर्षांत मी हजारो BP, हृदय, किडनी आणि सूज / Inflammation असलेल्या रुग्णांमध्ये एक pattern वारंवार पाहिला आहे:
"जर त्यांनी तेव्हा मीठ कमी केलं असतं, तर आज मला त्यांची औषधं कमी करता आली असती."
मीठविषयी हे 10 मुद्दे नक्की समजून घ्या:
1. WHO च्या मते सुरक्षित मर्यादा 1.5 ग्रॅम म्हणजे निम्मा टेबलस्पून आहे. पण आपण रोज 10–12 ग्रॅमपर्यंत नकळत जातो!
2. कधी जास्त होतो? पापड, लोणचं, फरसाण, सूप, मसाले, बिस्किटं हे सगळं “गुप्त मीठ” असतं.
3. स्वतः टाकलेलं मीठ थांबवणं सोपं आहे, पण हे ‘गुप्त मीठ’ थांबवणं खूप कठीण!
4. हृदयविकार, किडनी, सूज, डोकेदुखी, पायाला गोळे, रात्री वारंवार लघवीला उठणं यामागे एक मूळ कारण आहे – sodium overload.
5. Diabetes आणि BP असल्यास, मीठावर दुप्पट नियंत्रण आवश्यक आहे. फक्त गोळ्यांवर विसंबू नका.
6. साधं मीठ सोडून Low sodium salt वापरणं प्रत्येकासाठी योग्यच असेल असं नाही. Potassium वाढल्यामुळे काही आजार असलेल्या रुग्णांना धोका होऊ शकतो.
7. मीठ कमी करायचं म्हणजे चव नको असं नाही! लिंबू, हिंग, आल्याचा रस, ओवा, भाजलेले मसाले वापरा, चवही राहते आणि BPही नियंत्रणात राहतो.
8. दुपारी / रात्रीच्या जेवणात “तिखट-मीठ लोणचं” ही सर्वात मोठी चूक आहे!
9. सुपरमार्केटमध्ये ‘Low-Fat’ फूड घेताना त्यातल्या सोडियमकडेही लक्ष द्या!
10. मीठाचा सवयीचा दोष असतो, तो हळूहळू पण कायमचा बदलता येतो!
"Sugar kills silently. Salt kills subtly."
पण दोघांवरही नियंत्रण ठेवता येतो, तुम्ही ठरवलंत तर!
तुम्हाला वाटतंय तुमचं मीठ खूप वाढलंय? तुमचं BP जास्त येतंय? कमेंटमध्ये सांगा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts