Just For Hearts

Nutrition

दूध आरोग्यासाठी कसं आणि कधी प्यायचं हे महत्त्वाचं आहे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

दूध आरोग्यासाठी चांगलं असतं, पण कसं आणि कधी प्यायचं हे माहीत नसलं तर दूध त्रास देऊ शकतं!

1. रात्री झोपण्याआधी – कोमट दूध + हळद – झोप सुधारते, मेंदू शांत होतो, स्नायूंना आराम मिळतो.

2. उपाशीपोटी दूध नको – पचनावर ताण येतो, गॅसेस व अपचन होण्याची शक्यता.

3. साखर टाळा – दालचिनी, सुंठ, ओवा यांचा वापर करा – साखरेपासून बचाव आणि औषधी गुण मिळतात.

4. जास्त वेळ उकळू नका – Vitamin B12, प्रोटीनचे गुणधर्म नष्ट होतात.

5. थंड दूध टाळा – विशेषतः रात्री किंवा सर्दी, खोकला असताना – गरम दूध अधिक पचनसुलभ आणि सुरक्षित.

6. व्यायामानंतर दूध + प्रोटीन पावडर/दालचिनी – स्नायूंचं पोषण आणि थकवा कमी करण्यासाठी उत्तम.

7. दूध नेहमी जेवणानंतर किंवा हलक्या आहारानंतर घ्या – पोषण शोषण योग्यरित्या होतं, अपचन टाळता येतं.

8. लहान मुलांमध्ये दूध पिण्याच्या वेळा ठरवून ठेवा – सतत दूध न देता, वेळेनुसार दिल्यास भूक आणि पचन दोन्ही चांगले राहतात.

9. दूध चालत नसेल तर त्याचे पर्याय वापरा – ताक, साजूक तूप, नाचणीचं सूप, दुधात न पटणाऱ्यांसाठी उपयोगी.

10. दूध हे दुधासारखं घ्या मिठाईसारखं नव्हे! – पिठी साखर, बिस्किटं, कॉर्नफ्लेक्ससह दूध दिलं की त्याचा पोषक उपयोग कमी होतो.

दूधावर संशय नको – योग्य वेळ, योग्य प्रकार, आणि योग्य प्रमाण ठेवा आणि मग पाहा तेच दूध किती Healthy आहे!

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#milk#nutrition#healthy-habits#digestion#protein#turmeric#children#exercise
Share:WhatsAppXFacebook