Just For Hearts

Diabetes

तुमची साखर कमी आहे की जास्त, कशी ओळखायची?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

रुग्ण विचारतात, 'सर, माझी साखर कमी आहे की जास्त, कशी ओळखायची?'

२५ वर्षांच्या अनुभवातून सांगतो, रिपोर्ट्सच्या आधी येतात ते शरीराचे संकेत!

साखर कमी झाली (Hypoglycemia <70 mg/dL): - अचानक भूक लागणं, थंड घाम येणं - थरथर, अशक्तपणा, blackout - चिडचिड, गोंधळ, बोलणं विसरणं

जेवण चुकणं, गोळी/इन्सुलिन वेळेआधी घेणं, जास्त व्यायाम यामुळे Low Sugar होतो.

साखर जास्त झाली (Hyperglycemia >180 mg/dL): - तोंड कोरडं पडणं, वारंवार लघवी - थकवा, डोळ्यांपुढं धुंदी, भूक असूनही वजन घटणं

चुकीचा आहार, औषध चुकणं, ताण यामुळे High Sugar होतो.

घरच्या घरी काय करावे: 1. Fast आणि Post-meal sugar आठवड्यात २–३ वेळा मोजा. 2. Symptoms डायरीत लिहून ठेवा (“Low” की “High”). 3. अचानक घाम, थरथर, कोरडं तोंड → लगेच साखर मोजा. 4. Medicines/Diet बदलल्यावर pattern तपासा.

Scientific Target (ADA): - Fasting ८०–१३० mg/dL - Post-meal <१८० mg/dL - Below ७० mg/dL = Hypo (धोकादायक)

"रिपोर्ट्स नंतर येतात; शरीर आधी सांगतं. त्याचे संकेत ओळखा = complication टाळा!"

हा पोस्ट तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना शेअर करा, कारण साखर फक्त numbers नाही, जीवनशैलीचा संकेत आहे!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#blood-sugar#hypoglycemia#hyperglycemia#diabetes#symptoms#home-monitoring
Share:WhatsAppXFacebook