Lifestyle
ICU मध्ये एक मुलगी, तिची आई आणि एक असहाय हळवं वास्तव
ICU मधली राउंड घेताना अनेक गोष्टी कानावर पडतात, पण काही हृदयावर ठसतात...
40-45 वयाची मुलगी, आपल्या 75+ वयाच्या आईसाठी ICU मध्ये दिवस रात्र जागत बसलेली.
Massive stroke / paralysis attack. 7-8 दिवसांत सुधारणा मर्यादित.
खर्च वाढत चाललेला.
ती मुलगी म्हणते, "माझ्या आईसाठी शेवटपर्यंत सगळं करायचं आहे डॉक्टर..."
पण घरात एक आर्थिक वास्तव असतं.
पती किंवा इतर कुटुंबीय outcome वर प्रश्नचिन्ह लावतात: "किती दिवस ICU? किती खर्च?"
त्या क्षणी जे काही न बोलता तिच्या डोळ्यातून उमटतं, ते खूप काही सांगून जातं – आईसाठी खर्च करायची इच्छा असताना खर्च करू न शकणं ही भावना गळून पडणाऱ्या अश्रूंपेक्षाही खोल असते.
ही केवळ clinical केस नसते, ही असते एक flashback, आईचं जीवन, तिचा संघर्ष, आणि आता तिचं ICU मध्ये असहाय्य पडून राहणं.
मुलगी माझ्याकडे पाहते. एक उत्तर हवं असतं, एक आशा हवी असते... पण तीही मर्यादित असते.
"It’s not easy for a daughter. It’s not easy for a doctor either."
तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? आईच्या शेवटी काळजी घेण्याची ही असहाय्य स्थिती अनुभवली का?
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts