Just For Hearts

Lifestyle

Ikigai आणि आयुष्यभरासाठी आवश्यक सवयी ज्या डॉक्टर म्हणून मला जाणवल्या

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Ikigai वाचलंय? पण डॉक्टर म्हणून मला जाणवलेल्या काही सवयी आहेत ज्या आयुष्यभरासाठी आवश्यक आहेत!

जपानमधल्या Okinawa या बेटावर ९० ते १०० वयाचे लोक सक्रिय, निरोगी आणि आनंदी जगतात. त्यांचं रहस्य म्हणजे साध्या सवयी, सामाजिक नाती आणि जीवनात उद्दिष्ट (Ikigai).

त्यांच्या जीवनशैलीतून शिकण्यासारखे आयुष्य बदलणारे धडे:

1. उद्दिष्ट (Ikigai): सकाळी उठण्याचं कारण असू द्या, फक्त पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी. 2. हलका, संतुलित आहार: - ८०% पोटभर खाणं (Hara Hachi Bu नियम). - भाज्या, फळं, डाळी, मासे, ओमेगा-३ rich फूड. - साखर व प्रोसेस्ड अन्न कमी करा. 3. नित्य हालचाल: चालणं, घरातील हलकी कामं, स्ट्रेचिंग. 4. हसणे (Laughter Therapy): रोज मनापासून हसणं मानसिक ताण कमी करतं आणि प्रतिकारशक्ती वाढवते. 5. सोशल gathering: मित्र, कुटुंब, शेजारी यांच्यासोबत वेळ घालवणं – एकटेपणापेक्षा जास्त protective factor. 6. ताण कमी करणं: ध्यान, छंद, लहान आनंद अनुभवणं. 7. निसर्गाशी जोडणं: खुल्या हवेत वेळ घालवणं, झाडं, नैसर्गिक शांतता. 8. सकारात्मक मनोवृत्ती: आशावादी दृष्टी, कृतज्ञता, जीवनाकडे आनंदाने पाहणं.

Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life लेखक: Héctor García & Francesc Miralles

या पैकी एक तरी गोष्ट आजपासून सुरू करा. तुमचा अनुभव मला नक्की सांगा.

हे पोस्ट शेअर करा – कदाचित कोणाचं health आणि आयुष्य बदलू शकेल!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#ikigai#healthy-living#longevity#stress-reduction#balanced-diet#social-connections#laughter-therapy#positive-mindset
Share:WhatsAppXFacebook