Just For Hearts

Blood Pressure

घरी Blood Pressure मोजणं का गरजेचं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

घरी Blood Pressure मोजणं का गरजेचं?

फक्त औषधं घेतोय म्हणजे BP कंट्रोल आहेच असं नाही! घरी BP मोजणं म्हणजे ‘silent killer’ वर लक्ष ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

कोणासाठी आवश्यक? ✅ 1. नवीन निदान: औषध सुरू करण्याआधी 7–14 दिवस घरी BP मोजून नोंद ठेवा. यामुळे White coat hypertension आहे का हे कळतं. 2. औषध घेत असलेले रुग्ण: रोजचं BP control होतोय का हे फक्त घरी मोजल्यावर समजतं.

कसं मोजावं? 1. शांत बसून 5 मिनिटांनी मोजा. 2. चहा, जेवण, व्यायामानंतर लगेच मोजू नका. 3. BP cuff हृदयाच्या समांतर ठेवा. 4. दरवेळी 2 वेळा BP मोजा, सरासरी घ्या. 5. Google Sheet किंवा डायरीत दररोज नोंद ठेवा.

नोंदींचा उपयोग: • औषध कमी/वाढवायचं ठरवता येतं. • लाइफस्टाइलचा (ताण, आहार, झोप) परिणाम कळतो. • Masked BP / Early morning surge ओळखता येतो. Masked BP म्हणजे क्लिनिकमध्ये BP नॉर्मल वाटतो, पण घरी किंवा ऑफिसमध्ये तो जास्त असतो.

AHA व ESC (Hypertension Guidelines) नुसार Home BP Monitoring हे आजचं स्टँडर्ड आहे तसेच सर्व रुग्णांसाठी लागू.

❤️ Three Step Control Formula: 1. 2 वेळा BP मोजा, सकाळी व संध्याकाळी. 2. नोंद ठेवा, 7 दिवस सलग. 3. डॉक्टरांसोबत रिव्ह्यू / discuss करा.

"ही माहिती तुमच्या कुटुंबातल्या BP असलेल्या सदस्यांपर्यंत पोहोचवा WhatsApp वर नक्की शेअर करा. कारण… ‘BP कंट्रोल = स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटॅक आणि किडनी फेल्युअरपासून संरक्षण!’"

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#blood-pressure#home-monitoring#hypertension#heart-health#bp-control#white-coat-hypertension
Share:WhatsAppXFacebook