Mental Wellness
मन शांत ठेवायचं असेल तर दिवसाची सुरुवात बदलावी लागते
अनेक जण सांगतात की त्यांना झोप नीट येत नाही, चिडचिड वाढली आहे, लक्ष लागत नाही. त्यांचे reports normal असतात, life routine चालू असते, पण मन settled वाटत नाही.
यामागे एक महत्त्वाचा भाग असतो serotonin.
Serotonin म्हणजे काय?
Serotonin हे मेंदूमध्ये तयार होणारं रसायन आहे जे मनाची स्थिरता, झोप आणि भूक यावर परिणाम करतं.
हे 'आनंद देणं' काम करत नाही पण मन जास्त अस्थिर होऊ देत नाही.
शरीरात याची भूमिका काय?
1. Mood stability: भावना खूप वर-खाली जाऊ नयेत यासाठी मदत करते, म्हणूनच चिडचिड आणि बेचैनी कमी राहते. 2. Sleep regulation: Melatonin हे serotonin पासून तयार होतं. म्हणून serotonin व्यवस्थित असेल तर झोपेचा cycle सुधारतो. 3. Appetite control: भूक लागणं आणि तृप्ती जाणवणं या signals मध्ये serotonin भूमिका बजावतो. 4. Stress response modulation: ताण आल्यावर शरीराची reaction किती तीव्र असेल हे संतुलित ठेवण्यात मदत करते.
कमी झाल्यास काय दिसतं?
- झोप न लागणं / मध्ये जाग येणं - सततचा थकवा, लक्ष न लागणं - चिडचिड, बेचैनी - भूक बदलणं
म्हणजे समस्या 'mood' ची नाही… मनाच्या संतुलनाची आहे.
Serotonin सुधारण्यासाठी काय कराल? (Evidence-based habits)
1. सकाळचा सूर्यप्रकाश (15–20 मिनिटं): डोळ्यांमधून (retina) मेंदूला signal जातो आणि serotonin pathway सक्रिय होतो. 2. नियमित हालचाल (walking / light exercise): मेंदूतील रसायनांचं संतुलन सुधारतं, ज्यामुळे mood आणि energy दोन्हीवर परिणाम होतो. 3. झोपेची वेळ निश्चित ठेवा: Serotonin–melatonin cycle व्यवस्थित राहतो. उशिरापर्यंत screen टाळा. 4. संतुलित आहार (protein sources): Tryptophan (serotonin साठी आवश्यक घटक) मिळतो. डाळी, कडधान्य, अंडी, दूध यांचा उपयोग करा. 5. सामाजिक संपर्क (social interaction): पूर्ण एकटेपणा मन अस्थिर करतो; साधा संवादही protective ठरतो.
आज अनेक जण 'stress' हा शब्द वापरतात.
पण प्रत्यक्षात अनियमित झोप + कमी सूर्यप्रकाश + कमी हालचाल हा मोठा मुद्दा असतो.
आनंद शोधून मिळत नाही आणि motivation सतत टिकत नाही.
मन स्थिर ठेवलं तर दोन्ही आपोआप येतात.
मोठे बदल नकोत… सकाळ व्यवस्थित करा.
सूर्यप्रकाश + चालणं हे दोन बदल मेंदूच्या chemistry वर काम करतात.