Just For Hearts

Sleep

झोप बिघडते रात्री? कारण सकाळी तयार होतं

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

झोप बिघडते रात्री… पण कारण सकाळी तयार होतं.

“झोप लागत नाही… मधेच जाग येते…” ही तक्रार वाढत आहे आणि उपाय आपण रात्री शोधतो. पण शरीराची झोप बनण्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू होते.

झोप कशी तयार होते?

आपल्या Brain मध्ये एक “master clock” असतो - Suprachiasmatic Nucleus (SCN) (Brain चं टायमिंग सेंटर).

हा clock दिवस-रात्र ओळखतो आणि त्यानुसार hormone cycle सेट करतो. रात्री हा SCN - Brain चं टायमिंग सेंटर signal देतो Melatonin (झोपेचं hormone) वाढवा.

सकाळचा प्रकाश इथे कसा काम करतो?

सकाळचा सूर्यप्रकाश डोळ्यांमधून (retina) Brain पर्यंत जातो. Retina मध्ये असलेले light-sensitive cells (ipRGCs) हा प्रकाश पकडतात. हा signal थेट SCN पर्यंत पोहोचतो.

SCN - Brain चं टायमिंग सेंटर reset होतो आणि सांगतो - हा दिवस सुरू झाला आहे.

यानंतर शरीरात काय घडतं? 1. दिवसा serotonin (मन स्थिर ठेवणारी प्रणाली) सक्रिय होते. 2. संध्याकाळ–रात्र हाच pathway Melatonin मध्ये convert होतो.

म्हणजे: सकाळचा प्रकाश → SCN reset → serotonin → Melatonin → झोप

मग झोप का बिघडते?

1. उशिरा उठणं 2. सूर्यप्रकाश कमी (indoor lifestyle) 3. दिवसात हालचाल कमी 4. रात्री स्क्रीन exposure जास्त

SCN ला स्पष्ट signal मिळत नाही. मग शरीर confused होतं. कधी जागं राहायचं… कधी झोपायचं?

Natural reset

1. उठल्यावर 15–20 मिनिटं सूर्यप्रकाश. खिडकीतून नाही, शक्यतो outdoor. 2. दिवसात हालचाल (movement). Rhythm मजबूत होतो. 3. रात्री प्रकाश कमी करा (screens). Melatonin तयार होण्यासाठी अंधार आवश्यक. 4. झोपेची वेळ निश्चित ठेवा. Clock रोज reset होतो.

काही जण Melatonin tablets घेतात. Short-term काही cases मध्ये उपयोग होतो.

पण SCN Brain चं टायमिंग सेंटर आणि rhythm reset नसेल तर गोळीचा परिणाम मर्यादित राहतो.

समजून घ्या: झोप ही “रात्री घडणारी घटना” नाही. ती दिवसभर तयार होणारी प्रक्रिया आहे.

रात्री झोप सुधारायची असेल, तर रात्री प्रयत्न कमी…

सकाळचा प्रकाश सुधारावा लागतो.

सूर्यप्रकाश हा फक्त Vitamin D साठी नाही… तो तुमच्या Brain चा clock सेट करतो.

उद्या सकाळी 15 मिनिटं सूर्यप्रकाश घ्या, रात्री झोप स्वतः सुधारायला सुरुवात होईल.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#sleep-science#circadian-rhythm#morning-light#melatonin#sleep-disorders#healthy-sleep-habits
Share:WhatsAppXFacebook