Heart Health
दारू हृदयासाठी चांगली की वाईट? चला स्पष्ट करूया!
दारू हृदयासाठी चांगली की वाईट? चला एकदाचे स्पष्ट करूया!
कारण सध्या दारू सामान्य झाली आहे, आणि चुकीचं ज्ञान अजून सामान्य आहे...
1. दारू ही औषध नाही – ती एक सवय आहे. → ‘थोडी दारू हृदयासाठी चांगली’ हे वाक्य अर्धवट आहे आणि बर्याचदा चुकीचं ठरतं.
2. ‘थोडी दारू उपयुक्त’ हे फक्त आकड्यांमध्ये दिसतं – प्रत्यक्षात नाही. → काही मोठ्या अभ्यासांमध्ये हे दिसलं, पण त्या अभ्यासांमध्ये लोकांचं आयुष्य, खाणं, चालणं, स्ट्रेस – सगळंच वेगळं होतं. → आपण त्यांची नक्कल करतो, पण परिस्थिती वेगळी, शरीर वेगळं.
3. “Red wine मधलं घटक हृदयासाठी चांगलं” असं म्हणतात – पण खूपच थोड्या प्रमाणात. → उपयोगी असणारे घटक फक्त थोड्याशा प्रमाणात असतात – → तेवढा परिणाम मिळवायचा असेल, तर रोज १०–१५ ग्लास प्यावे लागतील – जे हृदयासाठी घातकच आहे!
4. दारू Blood Pressure वाढवते – विशेषतः नियमितपणा आल्यावर. → अनेक पेशंट्स 40–45 वयात पहिल्यांदा ‘साध्या’ पिण्यानंतर Blood Pressure वाढलेलं घेऊन येतात.
5. दारूमुळे हृदय ठोके अनियमित होऊ शकतात (Atrial fibrillation). → यालाच Holiday Heart Syndrome म्हणतात – पार्टी नंतर छातीत धडधड आणि गोंधळलेले ठोके.
6. दारूमुळे चरबी व Cholesterol वाढू शकतं – विशेषतः बिअरप्रेमींमध्ये. → अनेकांमध्ये Fatty liver, Triglycerides, Cholesterol वाढलेलं दिसतं.
7. दारू आणि सिगारेट मिळून हृदयविकाराचा धोका दुप्पट होतो. → ही जोडी शारीरिक पातळीवर अधिक घातक ठरते.
8. हृदयविकारानंतर ‘थोडी दारू तरी चालेल का?’ – उत्तर ठाम नाही. → झिजलेल्या हृदयाला अजून थकवणं धोकादायकच ठरतं.
9. दारूचा ‘थेट फायदा’ कुठेही ठामपणे सिद्ध झालेला नाही. → आणि चांगलं आरोग्य राखण्यासाठी दारूशिवाय अनेक सुरक्षित पर्याय आहेत – चालणं, झोप, तणावमुक्त जीवन.
10. दारू ही सामाजिक किंवा cultural सवय असू शकते – पण ती ‘हृदयाची गरज’ कधीच नव्हती आणि नसेल.
“जर तुम्ही प्यायचं समर्थन शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या हृदयाला आधीच दुर्लक्ष करताय.” एक दिवस हृदय ❤️ म्हणेल – ‘बस झालं!’ – तेव्हा आपल्याकडे वेळ नसेल.