Lifestyle
डॉक्टर, केदारनाथ ला जाऊ शकतो का? यात्रेसाठी 10 स्मार्ट आरोग्यदायी टिप्स
दररोज कुणीतरी विचारतो, "डॉक्टर, केदारनाथ ला जायचंय... मी जाऊ शकतो का?"
चला समजून घेऊयात केदारनाथ यात्रेसाठी १० स्मार्ट आणि आरोग्यदायी टिप्स:
1. किमान ४ आठवड्यांपूर्वी चालण्याचा सराव सुरू करा – रोज ३–५ किमी. 2. हृदय, फुफ्फुसं, आणि सांधे तयार हवे – चढ खडतर आहे. 3. BP, Diabetes, Asthma, किंवा orthopedic त्रास असलेल्यांनी आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा. 4. High altitude sickness ओळखा: डोकेदुखी, उलटी, चक्कर – लक्ष द्या आणि वेळेवर थांबा. 5. सकाळी लवकर चालणं सोपं – थंडी, थकवा, गर्दी टाळता येते. 6. थांबायचं ठिकाण, ऑक्सिजन पॉइंट, मेडिकल टेंट कुठे आहेत हे आधीच शोधून ठेवा. 7. पाण्याची कमतरता होऊ देऊ नका – हाय अल्टिट्यूड dehydration फार त्रासदायक ठरतो. 8. जवळचा मेडिकेशन किट ठेवा: BP/साखरेच्या गोळ्या, painkiller, acidity, ORS, झोपेसाठी आणि छोटे bandages. 9. गर्दी टाळा, स्वतःचा वेग ठेवा – दुसऱ्याला impress करायचं नसतं, स्वतःला सुरक्षित ठेवायचं असतं. 10. केवळ पोहोचणं हे यश नव्हे — चालत गेलेल्याला अनुभव मिळतो, जवळीक मिळते, आणि आत्मिक शांतता मिळते.
ही फक्त शारीरिक यात्रा नाही – ती मानसिक तयारी आणि आत्मिक स्पष्टतेची वाट आहे. जेव्हा शरीर थकतं आणि मन चालतं, तेव्हा खरी यात्रा सुरू होते.
मी गेल्या ७ वर्षांपासून दरवर्षी केदारनाथला जातोय. रस्ता, हवामान, चढ, ऑक्सिजनचा अभाव – सगळं जवळून अनुभवलंय. म्हणून सांगतो – श्रद्धा हवीच, पण तयारी त्याहून जास्त हवी.
फोटोतला milestone दिसला तर नक्की click करा, खरी चढाई तर येथूनच सुरू होते.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts