Lifestyle
Support system नसणं हा पण lifestyle problem आहे
Support system नसणं हा पण lifestyle problem आहे.
आज सगळे independent दिसतात. पण अनेक जण आतून एकटे आहेत.
आजार आला की कोणी वेळेवर आठवण करून देणार नाही, कोणी चालायला सोबत येणार नाही, कोणी थांबवणार नाही “आज विश्रांती घे.”
Health हा solo project नाही. तो team sport आहे.
काही जणांकडे caregiver असतो जो silently खूप काही करतो. आणि काही जण support हरवल्यामुळे सगळं माहीत असूनही अडखळतात.
मी अनेक patients पाहिले आहेत ज्यांना medicines, सल्ला, ज्ञान सगळं होतं… पण support नव्हता.
आणि काही असेही ज्यांच्याकडे एक माणूस होता, जो विचारायचा, आठवण करून द्यायचा, सोबत चालायचा आणि तेच त्यांचं मोठं medicine ठरलं.
म्हणून थोडा थांबून विचार करा.
जर कोणी असेल तर त्याबद्दल कृतज्ञ रहा. तो एक privilege आहे.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts