Heart Health
Heart Attack नंतर आयुष्य संपत नाही, नव्याने सुरुवात कशी करावी
Heart Attack नंतर आयुष्य संपत नाही, तर नव्याने सुरुवात होते!
Heart Attack नंतर 'नक्की करा' अशा 6 गोष्टी:
1. रोज चालणं हेच खरं औषध!
सकाळी शांतपणे 30-45 मिनिटे brisk walk करा. यामुळे circulation सुधारतो, मन शांत राहतं आणि clot होण्याचा धोका कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन नुसार रोज चालणं second heart attack चा risk 25% ने कमी करतं.
2. दुपारी झोपायचं नाही!
Post-lunch झोप घेतली की रात्रीची झोप disturb होते. यामुळे sugar आणि Blood Pressure control चुकतो. Early झोपणं आणि लवकर उठणं हाच success mantra आहे.
3. रोज Blood Pressure आणि Pulse मोजा
Digital BP monitor वापरा आणि रोजची values एक डायरीत नोंद करा. अचानक वाढणं किंवा कमी होणं म्हणजे body काही signal देतेय. Doctor कडे जाण्याचा तो इशारा असतो.
4. मीठ कमी करा, Fiber वाढवा
तिखट-खारट junk बंद करा. भरपूर salads, fruits, whole grains खा. साधं खाणं मोठा फरक करतं, Blood Pressure, Sugar, Cholesterol सगळं control मध्ये राहतं.
5. Stress कमी करण्याचा conscious प्रयत्न करा
मनातलं बोलणं, हलकी breathing exercises, आवडती hobby रोज 15 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. Stress कमी झाला की हार्टही हलकं वाटतं.
6. Cardiac Rehab चा भाग व्हा
हे फक्त व्यायाम नाही, यात fitness, diet, counselling सगळं combine असतं. ज्यांनी rehab follow केलं त्यांना दुसरा heart attack होण्याची शक्यता 35% ने कमी झाली आहे.
Heart Attack मुळे आयुष्य थांबत नाही, पण आता त्याला दिशा हवी!
Follow करा आणि तुमचा अनुभव comments मध्ये सांगा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts