Mental Wellness
Overthinking: फक्त विचार नाही, metabolic disturbance सुरू करणारी सवय आहे
Overthinking म्हणजे फक्त विचार नाही, तर metabolic disturbance सुरू करणारी सवय आहे. आणि ही बदलता येते.
Overthinking म्हणजे काय? मेंदू सतत alert mode मध्ये असतो. * cortisol (ताण hormone) वाढतो. * sleep quality बिघडते. * sugar / BP control कठीण होतं.
Overthinking कमी कसं करायचं? ह्या "tips" नाहीत… मेंदूला नवीन सवय शिकवायची आहे.
1. Thought Closure रात्री मेंदू का चालू राहतो? कारण काम अपूर्ण वाटतं. झोपण्याआधी 2 मिनिटं कागदावर लिहा: * उद्याचं एक महत्त्वाचं काम. * त्याचा पहिला step. मेंदूला signal मिळतो "हे मी विसरणार नाही" आणि विचार कमी होतात.
2. Thinking Time ठरवा आपण दिवसभर विचार थांबवायचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो वाढतो. दिवसात एक ठराविक वेळ ठेवा (उदा. संध्याकाळी 7 वाजता, 10 मिनिटं). त्या वेळेतच सगळे विचार करा. बाकी वेळ विचार आला तर स्वतःला सांगा "नंतर बघू". मेंदू हळूहळू discipline शिकतो.
3. Body-first reset मन control करणं कठीण आहे; शरीर control करणं सोपं आहे. 5 मिनिटं करा: * नाकातून श्वास घ्या. * हळू आणि लांब श्वास सोडा. श्वास सोडणं जास्त वेळ करा. शरीर relax होतं, heart rate कमी होतो, brain ला signal मिळतो "safe आहे".
4. Present moment technique Overthinking म्हणजे काय? तर future बद्दल जास्त विचार. म्हणून brain ला present मध्ये आणायचं. सोपी पद्धत: आजूबाजूला बघा आणि सांगा: * 5 गोष्टी मला दिसतायत. * 4 गोष्टी मी स्पर्श करू शकतो. * 3 आवाज मला ऐकू येतायत. उदाहरण: टेबल, फोन, पेन, दरवाजा, लाईट. हाताने खुर्ची स्पर्श करा. brain ला जाणवतं "मी safe आहे, आत्ता ठीक आहे" आणि विचार थांबायला मदत होते.
5. Input control रात्री mobile / reels / news मुळे brain overload होतो, त्यामुळे विचार वाढतात. झोपण्याआधी 30–60 मिनिटं screen बंद करा. simple activity करा (walking, reading, शांत बसणं).
6. Routine fix करा जेव्हा वेळ निश्चित नसते, त्याने मेंदू अस्थिर होतो. रोज एकाच वेळेला: * झोप * उठणं * जेवण brain ला predictability मिळते आणि anxiety कमी होते.
Overthinking थांबवायचं नाही… त्याला योग्य दिशा द्यायची आहे. Overthinking कमी करणं म्हणजे फक्त मन शांत करणं नाही… तर metabolism stable करणं आहे. * sugar * BP * sleep मन हेही एक metabolic organ आहे. बदलासाठी tracking आणि routine गरजेचं आहे, फक्त माहिती नाही. Just For Hearts वर basic tracking आणि self-assessment कायम free आहे, आजच सुरू करा.
तुम्हाला overthinking जास्त कधी होतं? * रात्री * reports पाहिल्यावर * एकटे असताना * stress वेळी comment करा.