Lifestyle
Mind हे एक Metabolic Organ आहे
"Mind हे एक Metabolic Organ आहे."
आपण ज्याला “Mind” म्हणतो ते म्हणजेच विचार, भावना, Cravings, निर्णयक्षमता. यामागे Brain metabolism कार्यरत असतो.
(Anatomically तो Brain आहे. Functionally आपण त्याला Mind म्हणतो.)
मेंदू शरीराच्या वजनाच्या फक्त 2% असला तरी विश्रांती अवस्थेत सुमारे 18–20% Glucose वापरतो.
म्हणजे साखरेची हाताळणी बिघडली तर मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
1. Insulin फक्त साखरेसाठी नाही
मेंदूत Insulin receptors असतात. तो भूक, पोट भरल्याची जाणीव आणि विचारक्षमतेशी संबंधित असतो.
Insulin resistance वाढल्यास भूक, Cravings आणि Clarity बदलू शकते.
2. Stress = Metabolic signal
दीर्घकाळ ताण → Cortisol वाढतो. यामुळे साखर वाढू शकते, पोटाभोवती चरबी वाढू शकते, Sleep बिघडू शकते.
3. कमी Sleep = Cravings जास्त
Sleep कमी असल्यास Ghrelin (भूक वाढवणारा Hormone) वाढतो तर Leptin (पोट भरल्याची जाणीव देणारा Hormone) कमी होतो.
मेंदूतील Reward centers जास्त सक्रिय होतात. Cravings वाढतात.
हा इच्छाशक्तीचा प्रश्न नसतो हा Neuro-metabolic प्रतिसाद असतो.
4. थकवा आणि Mood
Insulin resistance आणि सूक्ष्म दाह | Inflammation, मानसिक थकवा आणि एकाग्रतेवर परिणाम करू शकतात.
सर्व Mood समस्या Metabolic नसतात. पण Metabolism हा Contributing factor असू शकतो.
5. व्यायाम का Mood सुधारतो?
नियमित व्यायामामुळे BDNF (मेंदूतील पेशींच्या वाढीस मदत करणारा घटक) वाढतो.
म्हणून Movement हा फक्त शरीरासाठी नाही तर मेंदूसाठीही आहे.
Mind आणि Metabolism वेगळे नाहीत.
Metabolic सुधारणा म्हणजे फक्त साखर कमी करणे नाही तर Sleep, ताण, दिनक्रम आणि स्नायू संतुलन सुधारणे आहे.
Metabolic Reset वर आपण अजून सखोल जाणार आहोत.
ही चर्चा तुम्हाला कशी वाटते ❓ 💡 उपयोगी 🧠 विचार करायला लावणारी 🔥 डोळे उघडणारी 🤔 अजून शिकतोय