Nutrition
आजकाल Mixed Seeds खाण्याचा वाढता ट्रेंड आणि योग्य पद्धत
आजकाल 'Mixed Seeds' खाण्याचा ट्रेंड वाढत आहे.
पण जर खाण्याची पद्धत चुकीची असेल तर फायदा न होता त्रास होऊ शकतो.
Seeds योग्य पद्धतीने खाल्ल्यास हृदय, Diabetes, लठ्ठपणा, पचन, केस, त्वचा आणि हार्मोन्स यावर चांगला परिणाम होतो.
कोणते Seeds आणि त्यांचे फायदे? 1. Flaxseeds : Omega-3 ने समृद्ध, Cholesterol नियंत्रणासाठी, Heart साठी उपयुक्त. 2. Chia seeds : Fiber भरपूर, वजन कमी करण्यास मदत, पचन सुधारते. 3. Pumpkin seeds : Zinc आणि Prostate health साठी (पुरुषांसाठी उत्तम). 4. Sunflower seeds : Vitamin E ने समृद्ध, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. 5. Sesame seeds : Calcium पुरवतात, हाडे मजबूत करतात. 6. Fenugreek seeds : Sugar नियंत्रणात मदत, पचन सुधारते.
कसे घ्यावे? Preparation Guide: 7. Mix तयार करताना: • प्रत्येक Seed 100g घेऊन हलकं भाजून पावडर करून Glass jar मध्ये ठेवा. • दररोज 1-2 चमचे वापरा.
8. कसे खायचे? • सकाळी उपाशीपोटी पाण्यासोबत किंवा दुधात मिसळून. • जेवणाआधी दही, भिजवलेली oats किंवा smoothie मध्ये मिसळून.
9. Seeds vs Powder: • काही Seeds (जसे Flaxseeds) जर पावडर न करता खाल्ले तर शरीर त्याचा फायदा नीट absorb करू शकत नाही.
10. कधी टाळावे? • Thyroid, IBS, Gout किंवा अतिसंवेदनशील पचनप्रणाली असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. • अति खाल्ल्यास गॅसेस आणि bloating होऊ शकते.
❤️ माझं मत: मी अनेक रुग्णांना scientifically tailor केलेल्या Seeds combination मुळे HbA1c सुधारताना, वजन घटताना, आणि त्वचा-केसांमध्ये फरक दिसताना पाहिलंय.
हे औषध नाही, पण Lifestyle Medicine चा महत्त्वाचा भाग आहे.
📢 नवीन सवय सुरु करायची आहे का? फक्त खाणं नाही, काय, कसं, किती आणि का हे समजून घ्या. मगच फायदा होतो.
🔁 Seeds खाणं हे फॅड नाही, science आहे. ही पोस्ट आपल्या health-conscious मित्रांशी शेअर करा!