Heart Health
ताणमुक्त दिवसासाठी सकाळची एक सवय
ताणमुक्त दिवसासाठी सकाळची एक सवय
सकाळी उठल्यावर तुमचा हृदय, मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम अजून “rest mode” मध्ये असतात. दिवसाची सुरुवात करा सचेत श्वासोच्छ्वासाने (Mindful Breathing):
1. पाठीचा कणा सरळ ठेवा: छाती आणि फुप्फुसांना पूर्ण विस्तार मिळतो, फुप्फुस क्षमतेत वाढ होते. 2. डोळे मिटा: मेंदूतील अनावश्यक संवेदन उत्तेजन कमी होते आणि Parasympathetic system सक्रिय होते. 3. नाकातून 4 सेकंद श्वास घ्या: फुप्फुसांमधून ऑक्सिजन रक्तात मिसळतो, O₂ saturation सुधारते. 4. 4 सेकंद श्वास रोखा: ऑक्सिजन पेशींमध्ये (mitochondria) पोहोचून ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुरु होते. 5. 4 सेकंद श्वास सोडा: CO₂ बाहेर टाकून रक्तातील आम्ल-क्षार संतुलन सुधारते. 6. 5-7 मिनिटं रिपीट करा: हृदयगती स्थिर होते, Blood Pressure नैसर्गिकरित्या कमी होतो, मेंदूकडे स्थिर रक्तपुरवठा वाढतो. 7. ‘कृतज्ञता क्षण’ घ्या: डोळे अजून मिटलेले असताना 2–3 खोल श्वास घ्या आणि मनात तीन गोष्टी आठवा ज्या बद्दल तुम्ही खरोखर आभारी आहात, आरोग्य, कुटुंब, मित्र, किंवा स्वतःची प्रगती. ही कृती Serotonin आणि Dopamine वाढवते, Cortisol (stress hormone) कमी करते, आणि भावनिक स्थिरता देते.
दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनांनी केल्याने हृदय आणि नर्व्हस सिस्टीम ताणाला अधिक प्रभावीपणे हाताळतात.
हे फक्त श्वसन व्यायाम नाही तर मेंदू, हृदय आणि पेशींना मिळणाऱ्या ऑक्सिजनचा ‘morning booster’ आहे.
तुम्ही सकाळी मेंदूला ऊर्जावान ठेवण्यासाठी काय करता? कमेंटमध्ये लिहा, कदाचित तुमची पद्धत इतरांचं जीवन बदलू शकेल!
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts