Just For Hearts

Lifestyle

सकाळी उठल्यावर Morning Stiffness: कारणे आणि सोपे उपाय

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सकाळी उठल्यावर अंग जड, मान आखडलेली, आणि पाठ stiff वाटते का?

Morning Stiffness आता फक्त ज्येष्ठ लोकांची समस्या नाही; ३०-४० वयोगटातील लोकांनाही ती रोज अनुभवायला मिळते. झोपेतून उठल्यावर ही stiffness काही मिनिटांपासून अर्धा तासापर्यंत टिकू शकते.

हे का होते?

1. रात्रभर हालचाल न होणे 2. सतत बसून काम करणे 3. Vitamin D, B12 आणि Calcium ची कमतरता 4. Stress आणि कमी झोप 5. चुकीची गादी किंवा उशी

stiffness कमी करण्यासाठी सोपे रोजचे उपाय:

6. उठल्यावर लगेच २ मिनिटे हलक्या हालचाली करा 7. गरम पाणी प्या आणि थोडं चालणं करा 8. ५ मिनिटे साधे stretching करा, बसल्याजागीही करता येईल

कधी डॉक्टरांकडे जावे?

9. जर stiffness अर्धा तासापेक्षा जास्त टिकत असेल, सूज, ताप किंवा चालताना त्रास होत असेल तर दिरंगाई करू नका. फिजिशियन किंवा रुमेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.

"हलचाल हाच सर्वोत्तम उपचार आहे, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो."

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#morning-stiffness#spine-care#lifestyle#stretching#health-tips
Share:WhatsAppXFacebook