Just For Hearts

Lifestyle

Diabetes, Heart patients आणि वयोवृद्धांनी नवरात्र उपवास करताना लक्षात ठेवाव्या या ८ गोष्टी

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Diabetes, Heart patients आणि वयोवृद्धांनी नवरात्र उपवास करताना या ८ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

1. औषधं + उपवास = Hypoglycemia किंवा Blood Pressure drop होऊ शकतो! औषधं घेतल्यावर काहीतरी खाणं आवश्यक आहे कारण काही औषधं उपाशीपोटी घ्यायची नाहीत. Sugar स्ट्रिप्स आणि BP मशीन जवळ ठेवा.

2. फक्त बटाटा आणि साबुदाणा टाळा; पोषणमूल्य असलेले पर्याय निवडा. High GI पदार्थामुळे रक्तशर्करेचे चढ-उतार आणि थकवा होतो. स्मार्ट पर्याय: राजगिरा पोहे साजूक तूप आणि दहीसह, वरी भात शेंगदाणा आमटी आणि ताक, दुधासोबत सुके खजूर आणि सफरचंद, पेरू, पपईसारखी फळं.

3. शेंगदाणे आणि सुकामेवा मर्यादित प्रमाणात घ्या. जास्त घेतल्यास अॅसिडिटी, bloating आणि वजनवाढ होऊ शकते. प्रमाण ठरवा: 1 मूठ शेंगदाणे, 2 अक्रोड, 4 बदाम दररोज.

4. तळलेले पदार्थ एक दिवसाचा आनंद देतात पण ३ दिवस त्रास होतो. साबुदाणा वडा, चिप्स हे हृदय, वजन आणि पचनासाठी वाईट आहेत. हेल्दी पर्याय: थालिपीठ, baked उपास वडे, दही.

5. पाणी प्यायला विसरू नका. तहान कमी लागली तरी शरीरात पाण्याचा तुटवडा होतो. ताक, लिंबूपाणी, नारळपाणी आणि साजूक सूप घेणं फायदेशीर आहे. लक्ष्य ठेवा: 2.5 लिटर fluids दररोज.

6. हलका व्यायाम आणि प्राणायाम सुरू ठेवा. उपवास आणि अन्न मर्यादेमुळे ऊर्जा कमी वाटते. 10-15 मिनिटं चालणं आणि सौम्य योगासनं पचन आणि मूड सुधारतात.

7. जागरण, स्टेज कार्यक्रम, गरबा यामध्ये सावधगिरी बाळगा. वयोवृद्ध आणि हृदयरुग्णांनी थकवा आणि उपवास एकत्र टाळावा. पुरेशी झोप न झाल्यास शुगर आणि BP अनियमित होतात.

8. औषधं थांबवू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. Metformin, insulin, BP meds उपाशीपोटी घेतल्यास साइड इफेक्ट्स होऊ शकतात. फक्त औषधं बदलून चालत नाही, अन्न घेणंही महत्त्वाचं आहे.

श्रद्धा महत्त्वाची आहे, पण शरीर सशक्त ठेवणं गरजेचं आहे.

उपासात अन्नाचं स्वरूप बदला, पण आरोग्याची कधीही तडजोड करू नका.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#navratri#fasting#diabetes#heart-health#elderly#hypoglycemia#blood-pressure#nutrition
Share:WhatsAppXFacebook