Just For Hearts

General Health

NEET-PG Cut-off, Merit आणि Healthcare: थोडं शांतपणे समजून घेऊया

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

NEET-PG च्या कमी Cut-off वर Social media वर मोठी चर्चा, Memes, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, Merit, Reservation, Future doctors, Patient safety…

चर्चा गरजेची आहे. पण Context शिवाय Data generalize केला, तर चुकीचा निष्कर्ष समाजात जातो.

1️⃣ Zero / Negative Percentile, वास्तव काय? ही स्थिती प्रामुख्याने Pre-clinical / Para-clinical Branches मध्ये दिसते. Core Clinical Branches मध्ये अशी परिस्थिती नाही.

हे स्पष्ट न सांगता “Future Healthcare धोक्यात” असं म्हणणं Scientific दृष्ट्या चुकीचं आहे.

2️⃣ Reservation ला दोष देणं, इतकं सोपं नाही Reservation हा संवैधानिक सामाजिक वास्तव आहे. Exam conduct, Cut-off policy आणि Seat-filling निर्णय ही Administrative जबाबदारी आहे.

एका Systemic निर्णयाचं ओझं एका Social policy वर टाकणं ना योग्य आहे, ना नैतिक.

3️⃣ फक्त MBBS म्हणजे अपयश? अजिबात नाही भारतामध्ये MBBS होणं म्हणजे, लाखो विद्यार्थ्यांतून निवड, कठीण Training, मोठा संघर्ष.

👉 Ethical MBBS practice ही स्वतःत मोठी आणि सन्मानाची कामगिरी आहे. सगळ्यांनी PG केलंच पाहिजे, हा विचार चुकीचा आहे.

4️⃣ पण काही मुद्दे खरोखर गंभीर आहेत ✔️ Cut-off म्हणजे Cut-off ✔️ Qualify न झाल्यास Seat vacant राहिली तरी चालेल ❌ परीक्षा झाल्यावर Cut-off बदलणं Unfair आहे.

यामुळे अनेक sincere विद्यार्थ्यांना फसवणूक वाटू शकते. Perception देखील महत्त्वाची असते.

5️⃣ खरा प्रश्न आहे Medical Education System चा

• Faculty shortage • Good Teachers चा अभाव • Rigid NMC Rules • Practicing Experts ना शिकवायला अडथळे • Honorary Consultant Culture संपणं • Residents चे कमी Salary, Paid Seats, प्रचंड Fees

मी शिकवायला तयार आहे, पण Rules च अडथळा ठरतात.

6️⃣ एक निरीक्षण (थोडं उपरोधिक पण खरं) आज अचानक अनेकांना Future Healthcare ची चिंता वाटतेय, छान आहे.

पण Doctors वर होणारा हिंसाचार, अमानवी Duty hours, Resident Doctors चा कमी पगार यावर हीच चिंता क्वचितच दिसते.

Healthcare ही फक्त Doctors ची नाही, समाजाचीही Collective जबाबदारी आहे.

अर्धवट माहितीवर निष्कर्ष काढणं आणि संपूर्ण Healthcare बदनाम करणं हा उपाय नाही. Medical Education सुधारूया, Teaching ला प्रतिष्ठा देऊया, आणि Trust rebuild करूया.

हे काम सगळ्यांचं आहे.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#neet-pg#medical-education#healthcare-reform#doctor-shortage#patient-safety#reservation-policy#mbbs#pg-medical
Share:WhatsAppXFacebook