General Health
एक कुत्र्याचा Bite – आणि आयुष्य थांबू शकते. रेबीजचा धोका हलका घेऊ नका
एक कुत्र्याचा Bite – आणि आयुष्य थांबू शकते. रेबीजचा धोका हलका घेऊ नका.
उत्तर प्रदेशातील 22 वर्षीय कबड्डीपटू बृजेश सोलंकी यांनी तीन महिने आधी एका पिल्ल्याद्वारे चावला गेल्यानंतर लस न घेतल्यामुळे रेबीजने त्यांचा जीव गेला. त्यांचे rabies च्या यातनांचे videos फारच अस्वस्थ करणारे आहेत.
✅ रेबीजबद्दल थोडक्यात 1. 100% प्राणघातक – एकदा लक्षणं आली की इलाज नाही. 2. प्रत्येक चाव्यानंतर लगेच लस + Immunoglobulin (IVIG) घ्या. 3. लसीचं वेळापत्रक: दिवस 0, 3, 7, 14, 28 – एकाही दिवशी चुकवू नका. 4. लस घेतलेला कुत्रा असला तरी धोका असतो. 5. साबण + पाणी = 15 मिनिटं जखम धुवा – ही पहिली उपचार आहे. 6. चाव, स्क्रॅच, लिक… कुठलीही जखम कमी लेखू नका. 7. प्राण्यांवर प्रेम करा – पण सावधगिरी हीच खरी काळजी. 8. पाळीव प्राण्यांचं वेळेवर लसीकरण अनिवार्य करा.
प्रेमपूर्वक पाळण्यात आलेला पाळीव प्राणी असो किंवा रस्त्यावरचा अनाथ – रेबीज कोणालाही विचारून येत नाही. वेळ गमावले, आणि मग उपायही राहात नाही.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts