Just For Hearts

General Health

Oxidative Stress: ऊर्जा तयार करताना तयार होणारा “धूर”

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आपण खातो, चालतो, विचार करतो... हे सगळं शक्य होतं कारण शरीरात ऊर्जा तयार होते.

पण एक गोष्ट आपण सहसा लक्षात घेत नाही ऊर्जा तयार करताना शरीरात “धूर” सुद्धा तयार होतो.

हा “धूर” म्हणजे काय?

ऊर्जा तयार करताना काही Reactive Oxygen Species (ROS) म्हणजे प्रतिक्रियाशील ऑक्सिजन कण तयार होतात.

यालाच म्हणतात Oxidative Stress.

सोपं उदाहरण:

गॅस जळतो → उष्णता मिळते → पण धूरही तयार होतो

तसंच शरीरात:

ऊर्जा (ATP) तयार होते आणि “रासायनिक धूर” सुद्धा तयार होतो.

समस्या कधी होते?

जोपर्यंत हा धूर वेळेवर साफ होतो तोपर्यंत काही त्रास नाही.

पण जेव्हा:

- धूर जास्त तयार होतो - किंवा सफाई कमी होते

तेव्हा Oxidative Stress वाढतो.

शरीरावर परिणाम: हा ताण हळूहळू

- पेशींच्या भिंती - Protein - DNA

यांना नुकसान करतो आणि पुढे सुरू होतो inflammation.

OPD मधील अनुभव:

अनेक रुग्ण सांगतात “थकवा येतो… पण reports normal आहेत.” अशा वेळी पेशींच्या पातळीवर ताण चालू असू शकतो.

जीवनशैलीचा परिणाम: - प्रक्रिया केलेला आहार - जास्त साखर - कमी हालचाल - झोपेचा अभाव - सततचा ताण

हे सगळं हळूहळू धूर वाढवतं आणि chronic inflammation वाढवू शकतं.

शरीराकडे antioxidant system (धूर साफ करणारी नैसर्गिक यंत्रणा) असते.

पण “धूर जास्त, सफाई कमी” झाले की मग → imbalance तयार होतो.

Antioxidants: शरीर ही सफाई कशी करतं? हे next post मध्ये.

ऊर्जा तयार करणं जितकं महत्त्वाचं, तितकंच त्या प्रक्रियेत तयार होणारा “धूर” नियंत्रणात ठेवणंही आवश्यक आहे.

#oxidative-stress#energy-production#reactive-oxygen-species#inflammation#antioxidants#cellular-health#lifestyle#chronic-stress
Share:WhatsAppXFacebook