Heart Health
हृदयाच्या रुग्णांसाठी प्राणायाम: काय करावं आणि काय टाळावं
प्राणायाम हृदयासाठी औषधासारखं काम करू शकतं, पण योग्य प्रकार, योग्य वेळ आणि योग्य पद्धत निवडणं महत्त्वाचं आहे.
सर्व प्राणायाम प्रकार हृदयासाठी चांगले नसतात. खालील ५ मुद्दे लक्षात ठेवा:
१. अनुलोम-विलोम हा सर्वात सुरक्षित प्राणायाम आहे! ✅ - हळुवार श्वास घेणे आणि सोडणे parasympathetic nervous system सक्रिय करतो. - Blood Pressure आणि हृदयगती कमी होतात, तसेच तणावाचा स्तर घटतो. Reference: Indian Heart Journal, 2017
२. Kapalbhati हृदयरुग्णांनी टाळावा! ⚠️ - जोरात आणि वेगाने श्वास टाकल्यामुळे intrathoracic pressure वाढतो, ज्यामुळे हृदयावर ताण येतो. - Unstable angina किंवा recent bypass/angioplasty असणाऱ्यांनी पूर्णतः टाळावं.
३. Bhramari: शांत मनासाठी आदर्श! 🧘♂️ - 'ओम्' चा ध्वनी vagus nerve वर परिणाम करून relaxation वाढवतो. - Heart Rate Variability (HRV) सुधारतो, जो हृदयाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. Reference: International Journal of Yoga, 2020
४. श्वास रोखणे टाळा! 🚫 - दीर्घकाळ श्वास रोखल्याने oxygen कमी होतो आणि carbon dioxide वाढतो. - यामुळे ECG changes, arrhythmia किंवा chest discomfort होऊ शकतो. - High BP किंवा recent cardiac surgery असणाऱ्यांनी टाळावं.
५. थोडकं पण रोजचं करणे ही खरी गुरुकिल्ली आहे! 📅 - ५–१० मिनिटांचा रोजचा सराव हृदयासाठी पुरेसा आहे. - विविध प्रकार एकत्र केल्याने overload होऊ शकतो. - Certified yoga trainer चं मार्गदर्शन घ्या.
तुमचा अनुभव, शंका आणि मतं शेअर करा! - कोणता प्राणायाम तुम्हाला उपयोगी वाटतो? - काही प्रश्न आहेत का? - ह्या पोस्टची गरज असलेल्या मित्रांसोबत शेअर करा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts