Nutrition
पूर्वीचं अन्न, आजची औषधं, आणि उद्याचा त्रास – B12 कमतरतेचं मूळ
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
आजकाल B12 deficiency इतकी का वाढली आहे? 10 वर्षांपूर्वी असं नव्हतं. यामागील मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत:
1. आहारात बदल: अनेकजण आता दूध, दही, अंडी, मांस टाळतात, म्हणजे vegan-style आहार वाढला आहे. 2. पचनसंस्था कमकुवत: Antacids, acidity औषधं, antibiotics यामुळे B12 शोषण होत नाही. 3. सततचा तणाव आणि थकवा: शरीराची पोषणतत्त्वांची मागणी वाढली आहे पण पुरवठा नाही. 4. फास्ट आणि प्रोसेस्ड फूड: Ready-to-eat अन्नात B12 जवळजवळ शून्य असते. 5. आता टेस्टिंग लवकर होतं: पूर्वी निदानच कमी होतं, आता जागरूकता आणि टेस्टिंग वाढली आहे.
जीवनशैलीतील बदल आणि अन्नातून B12 न मिळणं हे आजच्या B12 deficiency ची खरी कारणं आहेत.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts
#b12#deficiency#nutrition#lifestyle#health#vitamin-b12