Just For Hearts

Diabetes

Self-Monitoring of Blood Glucose (SMBG): डायबिटीसमधील सोपी पण कमी वापरली जाणारी सवय

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Self-Monitoring of Blood Glucose (SMBG) ही डायबिटीसमधील सर्वात सोपी पण कमी वापरली जाणारी सवय आहे.

दिवसात काही वेळा केलेली sugar test तुमच्या उपचार-यशासाठी खूप महत्त्वाची आहे. HBA1C च्या मागे लपलेले दिवसातील highs–lows SMBG नेच पकडले जातात.

SMBG म्हणजे नेमकं काय?

ग्लुकोमीटरने दिवसात 2–4 वेळा blood sugar मोजणे. ADA नुसार SMBG करणाऱ्या रुग्णांचे नियंत्रण 25–30% अधिक चांगले दिसते.

SMBG का महत्वाचं?

1) जेवताच sugar किती वाढतो हे कळतं. Post-meal spikes हे complications चे मुख्य कारण आहेत, SMBG त्यांना थांबवते.

2) औषध/इन्सुलिनचा परिणाम लगेच दिसतो, काय काम करतं आणि काय नाही हे स्पष्ट होते.

3) अचानक low sugar (Hypo) ओळखायला मदत होते. <70 mg/dL वाचवलं तर hospitalisation टळू शकतो.

4) व्यायामाचा sugar वर होणारा परिणाम कळतो, कधी आणि कसा exercise करावा हे ठरवायला मदत होते.

5) HBA1C ‘ठीक’ असूनही hidden spikes SMBG पकडतो. HBA1C हे average आहे, SMBG हे आजचं truth दाखवते.

6) Doctor भेटी अधिक उपयोगी होतात, notes आणि readings मुळे अचूक निर्णय होतो.

7) घरच्या घरी small adjustments करणं सोपं होतं. जर एका दिवसात खूप highs किंवा lows दिसले तर त्वरित सुधारणा करता येते.

SMBG कधी आणि किती वेळा करावं?

• दिवसातून 1–2 वेळा (Minimum plan) Fasting + कोणत्याही एका जेवणानंतर • आठवड्यातून 2–3 दिवस focused monitoring • परिस्थितीनुसार: व्यायामापूर्वी/नंतर, नवीन औषध सुरू केल्यावर, किंवा तब्येत बिघडल्यास • महिन्याला 40–60 strips पुरेशा clinical decisions साठी enough data मिळतो

कॉस्ट बचत (सगळ्यात महत्वाचा मुद्दा):

1 महिन्याचा ₹300–₹500 खर्च, पण हजारोंची बचत. 2 Hospitalisation मध्ये 20–40% कमी. 3 एका महिन्याचा स्ट्रिप्स खर्च हा एक छोटे complication टाळल्यावर पूर्ण भरून निघतो.

तुम्ही SMBG कसं करता? वेळेवर? Random? की अजिबात नाही? Comment मध्ये नक्की सांगा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#blood-glucose#smgb#sugar-monitoring#diabetes-care#health#lifestyle
Share:WhatsAppXFacebook