Just For Hearts

Lifestyle

डॉक्टरांकडे जाताना ड्रेस कोड असावा का?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

OPD मध्ये गेल्या 25 वर्षांत हजारो रुग्ण पाहिलेत. काही उदाहरणं आठवतात:

एक working महिला, वय सुमारे 45, yoga top + फिट leggings + slippers; म्हणाली, "स्कूल-व्यायामानंतर थेट आले."

कॉलेजमधला एक तरुण: hoodie + shorts + कानात earphones, खुर्चीवर बसलेला.

गृहिणी - घरचं night gown + जुनी ओढणी; "पटकन आलेय म्हणून असं घातलंय."

वृद्ध काका - formal shirt-pant, neatly केस, clean get-up.

45-50 Male, trendy कपडे घालून, Gen Z च्या style चा प्रयत्न.

कोणता dress घालावा ह्यावर माझा काहीच आक्षेप नाही. काही कारणही नाही. गेल्या 2 दशकांतला हा बदल जवळून पाहीला आहे, चांगलाच आहे. परंतु waiting room मधील उपस्थितांमधील कुजबुज / gossip ही पाहीली आहे.

आपणास काय वाटते? आपण स्वत: patient किंवा caregiver ह्या भूमिकेतून OPD / Consulting / Hospital मध्ये गेला असाल.

तुमचे विचार जाणून घ्यायला आवडतील, कृपया मोकळेपणाने comment करा, तुमचं मत मोलाचं आहे.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#doctor-visit#dress-code#patient-experience#opd#healthcare-etiquette
Share:WhatsAppXFacebook