Lifestyle
लहान सुरुवात: Tiny Habits ची ताकद
मोठा बदल करण्याच्या प्रयत्नात बहुतेक लोक 1-2 आठवड्यातच थकतात.
B.J. Fogg म्हणतात: Habit इतका लहान करा की तो fail होऊ शकणार नाही.
लहान सुरुवात मेंदूला “हे सोपं आहे” असा संदेश देते आणि सवय टिकण्याची शक्यता वाढते.
आरोग्य सुधारण्याच्या प्रवासात मी पाहिलंय की जे रुग्ण 1 तास gym मध्ये सुरुवात करतात, ते 10 दिवसांनी थांबतात. पण जे फक्त 5 मिनिटांनी सुरुवात करतात, ते महिन्यांनी 30-40 मिनिटं सहज करतात.
उदाहरणं: 1. रोज 1 squat करा, हळूहळू 5, मग 10 करा. 2. फक्त 1 मिनिट meditation करा, नंतर 5-10 मिनिटांपर्यंत वाढवा. 3. जेवणानंतर 2 मिनिटं चालणं करा, नंतर 10 मिनिटांपर्यंत वाढवा. 4. रोज 1 bottle पाणी जास्त प्या, नंतर 2-3 bottles करा. 5. एक वेळ junk कमी करा, नंतर आठवड्यातून ३–४ वेळा कमी करा.
आज एक goal निवडा आणि त्याची सुरुवात इतकी छोटी ठेवा की नाकारता येणार नाही.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts