Lifestyle
Sugar, BP, Cholesterol, Fatty Liver वेगळे आजार वाटतात… पण ते एकाच Metabolic Problem चे भाग आहेत
Sugar, BP, Cholesterol, Fatty Liver वेगळे आजार वाटतात… पण मुळात एकाच ठिकाणी बिघाड असतो.
तो म्हणजे Metabolism (शरीराचं आतलं कामकाज).
चला, अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊया. Metabolism का बिघडतो? (वस्तुस्थिती)
1. सतत बसून राहणं (Sedentary Lifestyle बसणं जास्त, हालचाल कमी) शरीर हलत नाही तेव्हा Muscles Sugar वापरत नाहीत. Sugar रक्तातच राहते, Insulin जास्त लागतो, आणि हळूहळू Insulin Resistance तयार होते.
2. Late Heavy Meals (रात्री उशिराचं जेवण) रात्री शरीर Repair आणि Clean-up Mode मध्ये असतं. उशिरा, जड जेवण केलं की शरीर Fat साठवायला भाग पाडलं जातं. याचा परिणाम Weight, Sugar आणि Cholesterol वर होतो.
3. दिवसभर थोडंथोडं खात राहणं (Frequent Snacking) शरीराला कधीच “Rest” मिळत नाही. Insulin सतत स्रवतो आणि Metabolism गोंधळतो. भूक, Sugar आणि Fat Control सगळं बिघडायला लागतं.
4. झोपेचा गोंधळ (Poor Sleep / कमी किंवा विस्कळीत झोप) झोप ही Luxury नाही, ती Metabolic गरज आहे. झोप कमी झाली की Appetite Hormones, Sugar Control, BP सगळं ढासळतं. “झोप कमी, आजार जास्त” हे सरळ गणित आहे.
5. सततचा ताण (Chronic Stress - मनावरचा ताण) Stress Hormones शरीराला “Survival Mode” मध्ये ठेवतात. त्या अवस्थेत Fat साठवणं वाढतं, Sugar नियंत्रण सुटतं. Stress म्हणजे फक्त मानसिक नाही, तो Metabolic Problem आहे.
6. साखर आणि पांढरी पीठं (Sugar & Refined Carbs, गोड, मैदा, बेकरी Items) हे पदार्थ “ऊर्जा” देत नाहीत, ते शरीरावर अचानक Sugar Load टाकतात. Metabolism गोंधळतो, Fatty Liver, Diabetes, Cholesterol यांची सुरुवात इथूनच होते. (सरळ शब्दांत: हे खाल्लं की शरीर गोंधळून जातं की काय करावं कळत नाही.)
7. दिवसभर हालचाल कमी (Low Daily Movement - NEAT कमी) Exercise केला तरी उरलेले 23 तास बसून गेले, तर उपयोग मर्यादित. Metabolism रोज चालतो, आठवड्यातून नाही. दिवसभर हलणं हे Metabolism साठी अत्यंत महत्त्वाचं.
8. फक्त Report बघून इलाज (Report-based Thinking) Sugar, BP, Cholesterol हे फक्त Numbers आहेत. खरं प्रश्न आहे तो शरीर आतून कसं काम करतंय? Metabolism न सुधारता Reports सुधारत नाहीत, टिकत नाहीत.
25+ वर्षांचा अनुभव काय सांगतो?
हे आजार वेगवेगळे नाहीत. हे सगळे एकाच बिघडलेल्या Metabolism चे वेगवेगळे आवाज आहेत.
एक औषध वाढवलं की प्रश्न सुटत नाही. Metabolism सुधारला, तर सगळे Reports आपोआप सुधारायला लागतात.
काही वेळा Lifestyle व्यवस्थित असूनही Metabolism बिघडतो, तेव्हा Underlying कारण शोधणं गरजेचं असतं. यावर वेगळ्या Post मध्ये सविस्तर बोलू.
Dr. Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts